बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य बराच काळ एकत्र असतात. त्यामुळे एकमेकांशी भांडण, वादविवाद, मतभेद होणे हे सुरूच असते. बिग बॉस मराठीचा हा आठवडा थोडा खासच ठरणार आहे.बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्कमध्ये सदस्य भान हरपून खेळतात. त्यामुळे आठवड्याच्या सुरूवातीपासूनच घरामध्ये राडे बघायला मिळाले. घरातील समीकरण बदलताना दिसली. कोण कोणाच्या बाजूने खेळणार आणि कोण कोणाच्या विरोधात. नॉमिनेशन टास्कमध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोण होणार नॉमिनेट आणि कोण कोणाला करणार सेफ. तसेच आठवड्याच्या शेवटी घराला मिळणार नवा कॅप्टन.
बिग बॉस यांनी दिला सदस्यांना नवा आणि कठीण टास्क.बिग बॉस मराठीच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्यांना बिग बॉसने एक टास्क दिला आहे. आता या टास्कमुळे सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडणार असे दिसून येते आहे.बिग बॉसने जाहीर केले, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास असमर्थ ठरलेल्या फक्त दोनचं सदस्य अवघड शिक्षेला सामोरी जाणार आहेत. हे ऐकताच सदस्यांची झोप उडाली हे नक्की ! प्रोमोमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल नक्की कोणते सदस्य शिक्षेस पात्र आहेत.
विकास म्हणाला, विशाल आणि उत्कर्ष. विशाल त्यावर म्हणाला, असं मला कुठेही वाटतं नाही की मी कमी पडतो आहे. सोनली त्यावर म्हणाली, तेवढं मनोरंजन मला तुमच्याकडून नाही वाटलं. नवीन टास्कमध्ये कोणत्या दोन सदस्यांची नावे पुढे आली ? आणि कोणते सदस्य ठरले अवघड शिक्षेस पात्र? हे पाहणे रंजक असणार आहे.