Join us  

बिग बॉसची नेमप्लेट ते जुन्या पद्धतीचा टच! अक्षय केळकरने दाखवली ड्रीम होमची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 10:03 AM

Akshay kelkar: अक्षय केळकर झाला मुंबईकर; स्वप्नांच्या नगरीत घेतलं स्वत:च्या हक्काचं घर

स्वत:च्या हक्काचं घर घेणं ही प्रत्येकाची इच्छा असते. यात गेल्या काही काळात अनेक कलाकारांचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. अश्विनी महांगडे, शिवाली परब,स्मिता शेवाळे, पृथ्वीक प्रताप यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांचं हक्काचं घर खरेदी केलं आहे. यामध्येच आता बिग बॉस मराठी फेम अभिनेत्याचंही हे स्वप्न पूर्ण झालं आहे.

'बिग बॉस मराठी 4' चा विजेता अक्षय केळकर याने त्याचं हक्काचं घर घेतलं आहे. नुकतीच अक्षयने त्याच्या घऱाची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  सोबतच लवकरच या घराविषयीची माहिती चाहत्यांना देईन असंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे अक्षयने हे घर डिझाइन करतांना बराच विचार केल्याचंही या व्हिडीओतून लक्षात येतं.

अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या घराची झलक दाखवली आहे. यात त्याने बिग बॉसच्या घरात त्याला मिळालेली नेमप्लेट त्याने त्याच्या दरवाजाबाहेर लावली आहे. सोबतच या घराला काही अंशी बिग बॉसचा टच दिला आहे. अक्षयच्या घरात लाकडी फर्निचरचा जास्त वापर केल्याचं दिसून येतं. इतकंच नाही तर काही युनिक आणि अँटिक गोष्टींनी त्याने त्याचं घर सजवलं आहे.

दरम्यान, अक्षयने मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर घेतलं आहे. अक्षय मराठीसह हिंदी कलाविश्वात सक्रीय आहे. सध्या तो अबीर गुलाल या मालिकेत अगस्त्य ही भूमिका साकारत आहे. यापूर्वी त्याने ढोलकीच्या तालावर, दोन कटींग ३, नील मृगसी, माधुरी: वय विचारु नका, बाकरवडी, अशा कितीतरी मालिका, रिअॅलिटी शो, सिनेमा आणि वेब फिल्ममध्ये तो झळकला आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनबिग बॉस मराठीमराठी अभिनेतामुंबई