सलमान खान(Salman Khan)चा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी २ (Bigg Boss OTT 2) लाँच होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. शोमध्ये सदस्यांमध्ये वादविवाद, रोमांस आणि बरंच काही पाहायला मिळते. दर काही दिवसांनी मित्र बदलत असतात. या सगळ्या दरम्यान आता बिग बॉस ओटीटी २ च्या घरात दोन्ही स्पर्धकांमधील जवळीक वाढत आहे आणि ही गोष्ट पाहून घरातील सदस्यही आश्चर्यचकित झाले आहेत. शोमध्ये फलक नाज आणि अविनाश सचदेव यांच्यात मिलीभगत झाली आहे. बिग बॉसने दोघांचा एक मजेदार व्हिडिओही शेअर केला आहे.
जिओ सिनेमाच्या सोशल मीडिया अकाउंटवर बिग बॉस ओटीटी २चा एक नवीन प्रोमो आला आहे. या सीझनमध्ये पहिल्यांदाच स्पर्धक कोणत्याही प्रोमोमध्ये भांडत नसून एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये फलक नाज आणि अविनाश सचदेव यांचे अनेक क्षण जोडले गेले आहेत, ज्यामध्ये दोघेही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान, जिया शंकर आणि जेद हदीद यांची नजर फलक-अविनाशवर आहे. ते दोघेही त्यांच्याकडे खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवतात. जिया हे दोघे एकत्र छान दिसतात असे म्हणतानाही दिसली. दोघांच्या या व्हिडीओवर चाहते आपली प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहू शकले नाहीत. अनेकांनी त्यांना क्यूट असेही म्हटले आहे.
शोमध्ये आल्यानंतर अविनाश-फलक झाले चांगले फ्रेंड्स बिग बॉस ओटीटी २च्या घरातच फलक नाज आणि अनिवाश सचदेव चांगले मित्र बनले आहेत. जेव्हा या दोघांनी घरात प्रवेश केला तेव्हा ते प्रबळ स्पर्धक मानले जात होते. मात्र, आता फलक आणि अविनाश दोघेही आपला खेळ गमावत असल्याचे दिसत आहे. सलमान खानने फलकला गेम व्यवस्थित खेळण्याचा सल्लाही दिला आहे. याशिवाय सलमानने अविनाशला योग्य वेळी आवाज उठवण्याचे ज्ञान दिले आहे.