Join us  

Video: २७ वर्षीय मनीषा राणीने वडिलांना गिफ्ट केली आलिशान कार, बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 7:07 PM

बिग बॉस ओटीटी २ मध्ये झळकलेली मनीषा राणीने तिच्या वडिलांना आलिशान कार गिफ्ट केली आहे (manisha rani)

'बिग बॉस ओटीटी २' मध्ये झळकलेली सर्वांची लाडकी इन्फ्लुएन्सर म्हणजे मनीषा राणी. मनीषा राणी सोशल मीडियावर विविध गोष्टींमुळे चर्चेत असते. तिचे डान्स व्हिडीओ सुद्धा कमालीचे व्हायरल होत असतात. मनीषाने नुकतीच एक खास गोष्ट केलीय ज्यामुळे सोशल मीडियावर तिचं कौतुक होतंय. अवघ्या २७ वर्षीय मनीषा राणीने तिच्या वडिलांना आलिशान महिंद्रा कार गिफ्ट केली आहे. कार शोरुममधील मनीषा आणि तिच्या वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

लेकीने गिफ्ट केली कार, वडिलांच्या आनंदाला उधाण

मनीषाने कार शोरुममधील एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत मनीषा वडिलांसोबत शोरुममध्ये येते. पुढे गाडीवरील लाल कपडा हटवला  जातो. मनीषा आणि तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आलिशान गाडी पाहून आनंद ओसंडून वाहतो. मनीषा हा व्हिडिओ शेअर करताना लिहिते की, 'माझ्या वडिलांची नवीन कार. त्यांच्या मुलीकडून त्यांना एक नवीन भेट. आणखी एक स्वप्न पूर्ण झाले कारण वडिलांची स्वप्नं ही माझी स्वप्नं आहेत. मी त्यांची सर्व स्वप्नं पूर्ण करेन.' मनीषाच्या या भावूक शब्दांनी पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना तिचा अभिमान वाटतेय.

मनीषाने वडिलांना गिफ्ट केलेल्या कारची किंमत किती?

अवघ्या २७ व्या वर्षी मनीषाने वडिलांना आलिशान कार गिफ्ट केली आहे. मनिषाने महिंद्रा कंपनीची XUV कार गिफ्ट केलीय. या कारची किंमत १५ ते १६ लाखांच्या घरात असल्याचं समजतंय. लेकीने दिलेलं हे खास गिफ्ट पाहून तिच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं. त्यांनी मनीषाला कडकडून मिठी  मारली. मनीषानेही वडिलांचे डोळे पुसत त्यांच्यासोबत जल्लोष साजरा करत खास फोटोशूट केलं. 

 

टॅग्स :मर्सिडीज बेन्झबिग बॉसकार