Join us

वय वर्ष २४, बिग बॉस विनर, सापाचे विष आणि रेव्ह पार्टी प्रकरण; जाणून घ्या कोण आहे एल्विश यादव, कोट्यवधींची संपत्ती अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 4:09 PM

एल्विश हा युट्यूबर आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे.

 एल्विश यादव हा खूप प्रसिद्ध YouTuber आहे. त्याने बिग बॉस OTT 2 मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री केली आणि शोचा विजेता बनून इतिहास रचला. त्यानंतर एल्विश हे नाव घराघरात पोहोचले. दरम्यान, एल्विश आता रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात अडकला असून नोएडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआरही दाखल केला आहे. एल्विश यादवने परदेशी मुलींसोबत रेव्ह पार्टी केली होती आणि या पार्टीत कोब्रा सापाच्या विषाचा वापर नशेसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या ६ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आता एल्विश यादव अडकला आहे. एल्विश यादवचे नाव काही वादात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

हरियाणातील गुरुग्राम येथे जन्मलेला एल्विश यादव आई-वडिलांसोबत गुरुग्राममध्ये राहतात. त्याला एक मोठी बहीण कोमल यादव देखील आहे, ती विवाहित आहे. एल्विश हा युट्यूबर आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे. २०१६ मध्ये त्याने युट्यूब व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. एल्विश आज सोशल मीडियातील स्टार आहे. जो युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करतो.

बिग बॉस ओटीटी स्पर्धा जिंकल्यानंतर एल्विश यादवला २५ लाखांचे इनाम मिळाले आहे. मात्र त्याची संपत्ती आणि कमाई पाहता ही रक्कम फार मोठी नाही. बिग बॉस शोमुळे एल्विश यादवच्या फॅन फोलाईंगमध्ये तगडी वाढ झाली आहे. नेहमी त्याच्या लाईफस्टाईलनं आणि महागड्या कार कलेक्शनमुळे एल्विश चर्चेत असतो. त्याच्याकडे १.४१ कोटींची Porsche 718 Boxster कारसह अलीशान घरही आहे. हे सगळं त्याने युट्यूबवरील कमाईनं बनवले आहे.

एल्विश यादवच्या कलेक्शनमध्ये टोयोटा फॉर्च्युनर, हुंडई वेरणा, Porsche 718 Boxster यासारख्या लग्झरी कार आहेत. अलीकडेच एल्विशने गुडगाव इथं वजीराबादमध्ये अलीशान ४ मजली घर खरेदी केले. या घराची किंमत १२ ते १४ कोटी इतकी सांगितली जाते. युट्यूबशिवाय एल्विश यादव याच्या उत्पन्नाचे अन्य सोर्सही आहेत. महिन्याला एल्विश जवळपास १०-१५ लाख कमाई करतो. त्याची संपत्ती ४० कोटीच्या आसपास आहे. खूप लहान वयात एल्विशनं कोट्यवधीचं साम्राज्य उभं केले.

युट्यूब क्रिएटर्स त्यांच्या कंटेटवर येणाऱ्या ADS मधून पैसे कमावतात. कॅटेगिरी, रिजन आणि अन्य आधारे ही कमाई निर्भर करते. अनेक कंटेट क्रिएटर्स Ads रेवेन्यूच्या ५५ टक्के कमाई करू शकतात. एल्विशचं क्लोदिंग ब्रँडही आहे ज्याचे नाव Systumm_Clothing आहे. याशिवाय जाहिराती, हॉटेल, पेड स्पॉनशरशिपच्या माध्यमातून जोरदार कमाई करतो. युट्यूबवर एल्विशचे ३ चॅनेल आहेत. सर्व चॅनेल्सवर मिलियन्स फॉलोअर्स आहेत. 

टॅग्स :बिग बॉसदिल्लीपोलिस