Join us  

रणवीर शौरीचा Bigg Boss OTT 3 मेकर्सवर राग?; म्हणाला- "ज्याचे फॉलोअर्स जास्त त्यांनाच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 3:30 PM

अभिनेता रणवीर शोरीने बिग बॉसमधून बाहेर आल्यावर मीडियाशी संवाद साधताना त्याचा राग व्यक्त केलाय (ranvir shorey, bigg boss ott 3)

काल Bigg Boss OTT 3 ची ग्रँड फिनाले झाली. या ग्रँड फिनालेमध्ये सना मकबूलने बाजी मारली. सना आणि नेझी टॉप २ सदस्य होते. यापैकी सना मकबूलने Bigg Boss OTT 3 चं विजेतेपद पटकावलं. सना आणि नेझी Bigg Boss OTT 3 मध्ये शेवटचे टॉप २ सदस्य होते. त्याआधी तिसऱ्या नंबरवर रणवीर शोरीला घराबाहेर जावं लागलं. शो झाल्यावर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रणवीरने त्याच्या मनातला राग मीडियासमोर व्यक्त केला असं दिसतंय. 

सनापेक्षा जास्त लायक इतरही लोक: रणवीर

Bigg Boss OTT 3 मध्ये सना मकबूल आणि रणवीर शोरे यांच्यात चांगलीच भांडणं झाली. रणवीर सनाला 'नागीन', 'सरडा' असं म्हणाला होता. सनाने सुद्धा रणवीरला 'चिलगोझे' शब्द वापरुन चिडवलं होतं. याशिवाय यावर मीडियाने विचारलं असता रणवीर म्हणाला, "कोणी ज्युनियर जर एखाद्या सीनियरला अशी उत्तरं देत असेल तर सीनियरला ज्युनियरलाही सडेतोड उत्तर मिळेल. मला बिग बॉसच्या निर्णय मान्य आहे. पण सनापेक्षा घरात जास्त लायक लोक होते."

 

 

हे सदस्यही सनापेक्षा बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी पात्र: रणवीर

पुढे मीडियाशी बोलताना रणवीर म्हणाला, "सोशल मीडिया फॉलोईंगच्या बेसीसवर जर सदस्य घरात राहत असतील तर ज्यांचे फॉलोवर्स जास्त आहेत त्यांनाच ट्रॉफी द्यायची. हेच करायचं होतं तर अशीच ट्रॉफी दिली असती. मी ट्रॉफीसाठी पात्र होतो, अरमान मलिक होता. आणखीही लोक ट्रॉफीसाठी लायक होते." रणवीरने हे वक्तव्य करताच लोकांना वाटतंय की बिग बॉस मेकर्सच्या निर्णयावर नाराज आहे. याशिवाय सना मकबूलने बिग बॉस ओटीटी ३ ची ट्रॉफी जिंकली हे सुद्धा त्याला आवडलं नाहीय, असं लोकांचं म्हणणं आहे.

टॅग्स :बिग बॉसमराठीअनिल कपूर