Join us  

पायल की कृतिका, कोण आहे अरमान मलिकची कायदेशीर पत्नी ? पहिल्या पत्नीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 12:41 PM

बिग बॉसमधून बाहेर येताच पायलने पती अरमानबद्दल मोठा खुलासा केला. 

'बिग बॉस OTT 3' (Bigg Boss OTT 3) ला काही दिवसांपूर्वीच धमाकेदार सुरुवात झाली. यामध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती युट्यूब अरमान मलिकची (Armaan Malik). तो पायल आणि कृतिका या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसमध्ये सहभागी झाला. सोशल मीडियावर हे तिघंही भलतेच चर्चेत आहेत. नुकतंच अरमान मलिकची पहिली पत्नी पायल (Payal Malik) ही घराबाहेर पडली. बिग बॉसमधून बाहेर येताच तिनं पती अऱमान आणि कृतिकाबद्दल खुलासा केला. 

अरमान, पायल आणि कृतिका यांच्यावर ते बहुपत्नीत्वाचे समर्थन करत असल्याचा आरोप केला जातो. यावर पायल मलिक म्हणाली की, 'आम्ही कधीही बहुपत्नीत्वाचे समर्थन केलेलं नाही. अरमानने जी चूक केली, मला वाटत नाही की भारतातील कोणत्याही पुरुषाने ती करावी. आम्ही आमचं लग्न जपलं. परंतु मला वाटत नाही की इतर दुसरे कोणी असं करु शकेल.  एका स्त्रीसाठी तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीला घरी घेऊन येतो, यापेक्षा दुसरं मोठं दु:ख कोणतं असू शकत नाही. मला वाटत नाही की इतर कोणीही हे सहन करू शकेल'.

अरमान मलिक असं नाव असल्याने तो नेमका कोणता धर्म पाळतो, असा प्रश्न अनेकांना आहे. हिंदू विवाह कायद्यामध्ये एकापेक्षा जास्त जोडीदाराला परवानगी  ​​नाही. म्हणून अरमानने इस्लाम धर्म स्वीकारल्याचं म्हटलं जातं. पायल मलिकने अरमान मलिकच्या धर्म बदलाबद्दल खुलासा केला. अरमानने मुस्लिम धर्म स्वीकारला नाहीये आणि तो हिंदुच आहे. अरमानचे खरे नाव संदीप असल्याचे पायलने म्हटले. ती म्हणाली, 'मी त्याची कायदेशीर पत्नी आहे. कृतिका आणि अरमान लग्न कायदेशीर नाही. मात्र, माझ्या माहितीनुसार, जर पहिल्या पत्नीला तिच्या पतीने पुन्हा लग्न करण्यास कोणतीही अडचण नसेल, तर यात काही अडचण नाही'.

अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याचे युट्यूबवर ७ मिलियनपेक्षाही जास्त सबस्क्रायबर्स आहेत. अरमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. २०११ मध्ये त्याने पायल मलिकशी लग्न केलं होतं. त्यांना चिरायू नावाचा मुलगा आहे. त्यानंतर २०१८ मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड असलेल्या कृतिकाच्या प्रेमात अरमान पडला आणि तिच्याशी दुसरं लग्न केलं. अरमानच्या दोन्ही पत्नी एकाच वेळेस गरोदर असल्याने मलिक कुटुंब चर्चेत आलं होतं. अरमान मलिकला त्याच्या दोन्ही पत्नींपासून ४ मुले आहेत. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीसोशल मीडिया