Join us  

Exclusive: अनिल कपूर 'बिग बॉस मराठी'चा नवीन होस्ट रितेश देशमुखबद्दल म्हणाले- "तो एकदम.."

By देवेंद्र जाधव | Published: June 19, 2024 1:48 PM

'बिग बॉस मराठी'चा नवीन होस्ट रितेश देशमुखबद्दल अनिल कपूर यांची 'झक्कास' प्रतिक्रिया, म्हणाले..

बॉलिवूडचा 'झक्कास' अभिनेता म्हणजे अनिल कपूर. वयाची साठी ओलांडली तरीही अनिल कपूर मनोरंजन विश्वात नवनवीन प्रयोग करु पाहत आहेत. लवकरच अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी 3' च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यानिमित्ताने अनिल यांनी 'लोकमत फिल्मी'शी खास बातचीत केली. अनिल कपूर हिंदीत सलमान खानला रिप्लेस करत 'बिग बॉस ओटीटी 3'चं सूत्रसंचालन करणार आहेत. याशिवाय 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्ये महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख होस्टिंगची जबाबदारी सांभाळणार आहे. हे कळताच अनिल कपूर यांनी खास प्रतिक्रिया दिली.

रितेशबद्दल अनिल कपूर काय म्हणाले?

अनिल कपूर यांना मुलाखतीत महेश मांजरेकर यांच्याबद्दल सांगण्यात आलं. महेश मांजरेकर यांनी 'बिग बॉस मराठी'चे आधीचे सीझन होस्ट केले होते. अनिल यांना याविषयी माहित नव्हतं. त्यांना जसं कळलं की, महेश मांजरेकर यांनी 'बिग बॉस मराठी'चं होस्टिंग केलंय तसं त्यांना आश्चर्य वाटलं. "मै अभी महेश जी को फोन करता हू, और उनसे बात करता हू", असं ते म्हणाले. पुढे रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचं होस्टिंग करणार कळाल्यावर अनिल कपूर यांनी दोनच शब्दात प्रतिक्रिया दिली. "वो फोडके रख देगा", असं म्हणत अनिल यांनी रितेशला शुभेच्छा दिल्या.

 

बिग बॉस ओटीटी 3 कधी सुरु होणार?

लवकरच 'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सीझन सुरु होणार आहे. 'बिग बॉस'चा होस्ट सलमान खान नव्या सीझनची सूत्रं सांभाळणार नाहीये. सलमानऐवजी बॉलिवूडमधले लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी ३' च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. Bigg Boss OTT 3 #AbSabBadlega २१ जूनपासून  JioCinema Premium वर रात्री ९ वाजता बघू शकता

टॅग्स :अनिल कपूररितेश देशमुखबिग बॉसबिग बॉस मराठी