Join us

Bigg Boss OTT 3 Finale : या पाच स्पर्धकांमध्ये लढत, विजेत्याला मिळणार २५ लाख रुपये बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 18:51 IST

Bigg Boss OTT 3 Finale : बिग बॉस ओटीटी ३ चा अंतिम सोहळा आज म्हणजेच २ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. लवकेश कटारिया आणि अरमान मलिक नुकतेच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. यानंतर, या सीझनमधील टॉप ५ स्पर्धकांमध्ये आता लढत पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss OTT 3 Finale : बिग बॉस ओटीटी ३ चा अंतिम सोहळा आज म्हणजेच २ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. ग्रॅण्ड फिनाले पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. वास्तविक, लवकेश कटारिया आणि अरमान मलिक नुकतेच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. यानंतर, या सीझनमधील टॉप ५ स्पर्धकांमध्ये आता लढत पाहायला मिळणार आहे. विजेते स्पर्धकाला २५ लाख रुपये बक्षीस मिळणार असल्याचे समजते आहे. बिग बॉस ओटीटी ३च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये प्रमुख पाहुणे कोण असणार आहे, यासंदर्भातील माहितीदेखील समोर आली आहे.

लवकेश आणि अरमान मलिक घराबाहेर पडल्यानंतर रणवीर शौरी, सना मकबूल, नेजी, साई केतन आणि कृतिका मलिक यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर काही रिपोर्ट्सनुसार, सना मकबूल आणि रणवीर शौरी यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. तर नेजीलाही चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. यामुळे, या तीन स्पर्धकांपैकी बिग बॉस ओटीटी ३ विजेता होऊ शकतो.

हे प्रमुख पाहुणे असतीलबिग बॉस ओटीटीच्या सीझन ३ च्या ग्रँड फिनालेशी संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव प्रमुख पाहुणे म्हणून शोमध्ये हजेरी लावणार आहेत. तर स्त्री२च्या प्रमोशनसोबतच ते कोणता स्पर्धक बाहेर जाणार याबद्दल सांगताना दिसू शकतात.

कधी आणि कुठे पाहू शकतो ग्रॅण्ड फिनालेबिग बॉस ओटीटी सीझन ३चा ग्रँड फिनाले २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता जिओ सिनेमावर प्रसारित होईल. सीझनमध्ये बाहेर पडलेले स्पर्धकही यात दिसणार आहेत.

टॅग्स :बिग बॉसरणवीर शौरी