Join us  

Bigg Boss OTT 3: चार दिवसातच घरातल्या या पहिल्या सदस्याची Exit? धक्कादायक निकाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 11:18 AM

Bigg Boss OTT 3 मध्ये मिड विक एविक्शन झालं असून पहिल्या आठवड्यात एका स्पर्धकाला बाहेरचा रस्ता धरावा लागल्याची चर्चा आहे (bigg boss ott 3)

Bigg Boss OTT 3 ची चर्चा सध्या शिगेला आहे. यंदाच्या सीझनमध्ये विविध शहरांतून आलेले स्पर्धक बिग बॉसचं घर गाजवत आहेत. यंदा सलमान खानच्या ऐवजी अनिल कपूर Bigg Boss OTT 3 चं सूत्रसंचालन करत आहेत. अशातच Bigg Boss OTT 3 मधील पहिला धक्कादायक निकाल समोर आलाय. आठवडा पूर्ण होत नाही तोच Bigg Boss OTT 3 मधून पहिल्या स्पर्धकाला बाहेरचा रस्ता धरावा लागला आहे.

Bigg Boss OTT 3 मधून पहिला स्पर्धक घराबाहेर?

बिग बॉस ओटीटी 3 मधून पहिला स्पर्धक घराबाहेर गेलाय अशी चर्चा आहे. बिग बॉसविषयी जे खबरी पेज असतात त्यांनी याविषयी माहिती दिली. या आठवड्यात मिड विक एविक्शनसाठी शिवानी कुमार आणि बॉक्सर नीरज गोयत हे दोघे नॉमिनेट होते. या दोघांपैकी बॉक्सर नीरजला घराबाहेर जावं लागल्याची चर्चा आहे. खबरी पेजनुसार शिवानीपेक्षा कमी वोट मिळाल्याने नीरजची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झालीय. 

कोण आहे नीरज गोयत?

नीरज गोयत हा व्यावसायिकरित्या प्रो बॉक्सर आहे. त्याने WBC  एशियाचे विजेतेपदही जिंकले आहे. हरियाणाच्या कर्नालमध्ये राहणारा नीरज गोयत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. तो सोशल मीडियावर विविध व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो.याशिवाय तो अनेक बॉलिवूड स्टार्सना अभिनयासाठी बॉक्सिंगचे प्रशिक्षणही देतो. त्याने फरहान अख्तर, रणदीप हुड्डा आणि राम चरण यांसारख्या स्टार्सना बॉक्सिंगच्या ट्रिक्स शिकवल्या आहेत. नीरज गोयत घराबाेह गेल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

टॅग्स :बिग बॉसजिओअनिल कपूर