Join us  

Bigg Boss OTT 3 मध्ये होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, घरात 'ही' स्पर्धक होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 5:31 PM

Bigg Boss OTT 3 मध्ये या बोल्ड आणि बिनधास्त स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे.

 Bigg Boss OTT 3 ची सध्या चांगलीच चर्चा आहे.  Bigg Boss OTT 3 मध्ये आतापर्यंत दोन स्पर्धक दोन आठवड्यात घराबाहेर गेलेत. त्यापैकी एक बॉक्सर नीरज गोयत. दुसरी स्पर्धक म्हणजे अरमान मलिकची पत्नी पायल मलिक. हे दोन स्पर्धक घराबाहेर गेल्यावर आता  Bigg Boss OTT 3 मध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. ही स्पर्धक म्हणजे ब्रिस्टी समद्दर. ब्रिस्टी ही तिच्या बोल्ड व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ब्रिस्टी समद्दर बिग बॉसमधली पहिली वाईल्ड कार्ड?

TV9 भारतवर्षने दिलेल्या अहवालानुसार,  Bigg Boss OTT 3 मध्ये ब्रिस्टी समद्दर पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री करणार आहे. ब्रिस्टीचे इन्स्टाग्रामवर ८ लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. ब्रिस्टी बाईक रायडर सुद्धा असून तिचे बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. ब्रिस्टी Bigg Boss OTT 3 च्या घरात आल्यावर काय हंगामा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ब्रिस्टीसोबतच घरात राखी सावंत सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी होणार असं सांगितलं जातंय. आता ब्रिस्टी आणि राखीपैकी कोण घरात येणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

 Bigg Boss OTT 3 मध्ये आतापर्यंत काय झालं?

 Bigg Boss OTT 3 चं होस्टिंग यावेळी सलमान खान ऐवजी अनिल कपूर करत आहेत.  Bigg Boss OTT 3 सुरुवातीपासून चर्चेत आहे. त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी. दोन्ही पत्नींसोबत अरमानला बिग बॉसमध्ये एन्ट्री दिल्याने शोवर खूप टीका झाली. याशिवाय बिग बॉसमध्ये सहभागी झालेला लव्हकेश कटारिया एल्विश यादवच्या फॅन्सचा आधार घेतो म्हणून अनिल कपूर यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. शोमध्ये सहभागी झालेली वडापाव गर्ल आणि शिवानी कुमारी सुद्धा त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे चर्चेत आहेत.

टॅग्स :बिग बॉसअनिल कपूर