'बिग बॉस ओटीटी 3' ला कालपासून शानदार सुरुवात झालीय. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये एक से बडकर एक स्पर्धक सहभागी झाले आहेत. अशातच सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे उत्तर प्रदेशती प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर शिवानी कुमारीची. इन्स्टाग्रामवर ४ लाख फॉलोअर्स असलेल्या शिवानीचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. इतकंच नव्हे तर सुरुवातीला व्हिडीओ बनवते म्हणून तिच्या आईने तिच्यावर सुरा उगारुन तिच्यावर वार केला होता. शिवानीने सांगितलेली दर्दभरी कहाणी ऐकून अनिल कपूरही भावूक झाले.
शिवानीच्या जन्म झाला तेव्हा कुटुंबाला दुःख झालं
शिवानीने काल 'बिग बॉस ओटीटी 3'च्या मंचावर शिवानी कुमारीची एन्ट्री झाली. अनिल कपूर यांना बघताक्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं. पुढे शिवानीने तिच्या आयुष्याचा प्रवास सांगितला. शिवानीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सर्वांनी दुःख व्यक्त केलं. कारण तिच्याआधी तिच्या आईने तीन मुलींना जन्म दिला होता. शिवानीच्या निमित्ताने चौथीही मुलगीच झाल्याने तिचं कुटुंब आणि गावात शोककळा पसरली होती.
व्हिडीओला विरोध म्हणून आईने चाकूने वार केला
शिवानीच्या जन्मानंतर अवघ्या एका वर्षात तिच्या वडिलांचे निधन झाले. वडील गेल्यानंतर तिची आई रात्रंदिवस काम करून कुटुंबाला एक वेळचे जेवण पुरवू लागली. शिवानी मोठी झाल्यावर तिने स्वतः घरी काम करून पैसे कमवले आणि शिक्षण पूर्ण केले. शिवानीने तिचा घरखर्च भागवण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला शिवानीच्या आईला तिचे व्हिडिओ बनवणे अजिबात आवडले नव्हते. इतकंच नव्हे आईने रागाच्या भरात शिवानीवर सुरा उगारुन तिच्या पोटावर वार केला होता. आईचा विरोध असूनही शिवानी तिचे व्हिडीओ बनवत राहिली. हळूहळू हे व्हिडीओ व्हायरल झाले. अशाप्रकारे संघर्षाचा प्रवास करत असलेली शिवानी आता 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दाखल झालीय.