Join us

सना मकबूल झाली Bigg Boss ott 3 ची विजेती, मिळाली २५ लाख रुपयांची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 23:41 IST

Bigg Boss ott 3 विजेती सना मकबूल झाली असून सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय

Bigg Boss ott 3 ची विजेती सना मकबूल झाली आहे. सनाने टॉप 5 मधील इतर स्पर्धकांवर मात करत Bigg Boss ott 3 चं विजेतेपद पटकावलं आहे. सना आणि नेझी टॉप 2 मध्ये आले होते. यापैकी सनाने Bigg Boss ott 3 च्या विजेतेपदावर तिचं नाव कोरलं आहे. रणवीर शोरी, क्रितिका मालिका, नेझी, साई केतन राव आणि सना मकबूल हे ५ स्पर्धक Bigg Boss ott 3 च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. त्यापैकी सना विजयी स्पर्धक म्हणून घोषित करण्यात आली आहे. 

सनावर झाला बक्षिसांचा वर्षाव

Bigg Boss ott 3 ची विजेती सना मकबूलवर बक्षिसांचा वर्षाव झालाय. सनाला २५ लाख रुपये विजयी रक्कम मिळाली आहे. याशिवाय सोन्याचं फिनिशिंग असलेली बिग बॉस ओटीटी 3 ची झगमगती ट्रॉफी सनाला देण्यात आली आहे. याशिवाय विविध स्पॉन्सर्सकडून सनावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आलाय. अशाप्रकारे Bigg Boss ott 3 जिंकल्यावर सना आर्थिक दृष्ट्याही मालामाल झाली आहे असं म्हटल्यास हरकत नाही. 

 

सना सुरुवातीपासून स्ट्राँग खेळाडू 

Bigg Boss ott 3 मध्ये सना सुरुवातीपासून एक सक्षम खेळाडू म्हणून ओळखली जातेय. सनाने घरातील प्रत्येक टास्क चांगल्यारीतीने खेळला आहे. इतकंच नव्हे, घरात मैत्री करण्यात सुद्धा सना पुढाकार घेत होती. सना, नेझी, विशाल पांडे आणि लवकेश कटारिया या चौघांच्या मैत्रीचं लोकांनी कौतुक केलं. सना आणि नेझी यांची खास बाँडींग सुद्धा लोकांच्या चर्चेचा विषय ठरली. रणवीर शोरी आणि सनामध्ये झालेले टोकाचे वादही चांगलेच गाजले. सना बिग बॉस ओटीटीच्या घरातील एक well dressed असणारी स्पर्धक होती म्हणूनही लोकांनी तिला डोक्यावर घेतलं. सना जिंकल्यामुळे तिच्या फॅन्सना नक्कीच आनंद झाला असेल यात शंका नाही.

टॅग्स :बिग बॉसअनिल कपूर