Join us  

Bigg Boss OTT 3: पत्नीच्या बेस्ट फ्रेंडबरोबरच केलं दुसरं लग्न, युट्यूबर अरमान मलिकची दोन्ही पत्नींसह एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:02 AM

यंदाच्या सीझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींसह सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. बिग बॉसच्या घरात अरमान मलिकने त्याच्या पत्नी कृतिका आणि पायलबरोबर दिमाखात एन्ट्री घेतली आहे.

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस ओटीटी'चं दुसरं पर्व संपल्यापासूनच चाहते 'बिग बॉस ओटीटी ३'च्या प्रतिक्षेत होते. 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. यंदाच्या सीझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींसह सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. बिग बॉसच्या घरात अरमान मलिकने त्याच्या पत्नी कृतिका आणि पायलबरोबर दिमाखात एन्ट्री घेतली आहे.  बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच अरमान आणि त्याच्या दोन पत्नींना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. अरमान त्याच्या पत्नींबरोबर युट्यूबर व्हिडिओ बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. आता दोन्ही पत्नींबरोबर तो बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचं मनोरंजन करतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याचे युट्यूबवर ७ मिलियनपेक्षाही जास्त सबस्क्रायबर्स आहेत. अरमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. २०११ मध्ये त्याने पायल मलिकशी लग्न केलं होतं. त्यांना चिरायू नावाचा मुलगा आहे.

त्यानंतर २०१८ मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड असलेल्या कृतिकाच्या प्रेमात अरमान पडला आणि तिच्याशी दुसरं लग्न केलं.

अरमानच्या दोन्ही पत्नी एकाच वेळेस गरोदर असल्याने मलिक कुटुंब चर्चेत आलं होतं. अरमान मलिकला त्याच्या दोन्ही पत्नींपासून ४ मुले आहेत.  

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकारयु ट्यूबअनिल कपूर