बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झालेली दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल अशी ओळख असलेल्या चंद्रिका दीक्षितला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चंद्रिका कायदेशीर कचाट्यात अडकली असून तिच्यावर १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आलाय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अंसारीने याचा खुलासा केला असून नेमकं प्रकरण काय ते सांगितलं आहे.
चंद्रिकावर मानहानीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
फैजान अंसारीने त्याच्या X अकाऊंटवर याप्रकरणी खुलासा केलाय. फैजानने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यात म्हटलं गेलंय की, "स्वच्छतेची कोणतीही काळजी न घेता वडापाव गर्ल पदार्थ बनवते. तिने बनवलेला वडापाव लोकप्रिय असला तरीही तो हेल्दी नाही. चंद्रिका संपूर्ण देशात इंदौरचं नाव खराब करतेय. ती फ्रॉड असून वडापाव बनवण्यात शरीराला हानीकारक असलेले जिन्नस वापरते." फैजानने तक्रारीची कॉपीसुद्धा शेअर केलीय.
चंद्रिकावर १०० कोटींची मानहानी
फैजान अंसारीने तक्रारीत पुढे म्हटलंय की, "कोणाला स्वतःच्या आयुष्यावर प्रेम असेल तर तिने बनवलेला वडापाव अजिबात खाऊ नका. मी पोलिसांना विनंती करतो की, चंद्रिकाच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी करण्यात यावं. त्यामुळे लोकांना सत्य परिस्थितीचा उलगडा होईल." अशी तक्रार दाखल करुन फैजानने चंद्रिकावर १०० कोटींच्या मानहानीचा गुन्हा दाखल केलाय. आता या प्रकरणी पोलीस चंद्रिकावर कोणती कारवाई कारणार? तिला अटक होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.