बिग बॉस ओटीटीचा ग्रँड प्रीमिअर (Bigg Boss OTT Premiere) चांगलाच रंगला. करण जोहरची होस्टिंग, ग्लॅमरचा तडका आणि बिग बॉसचा आवाज हे सगळं पाहून प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला़. रात्री 8 च्या ठोक्याला वूट अॅपवर बिग बॉस ओटीटीच्या ग्रँड प्रीमिअरला सुरूवात झाली. करण जोहर त्याच्या चिरपरिचित अंदाजात बिग बॉसच्या मंचावर आला. मग एकापाठोपाठ एक धमाकेदार परफॉर्मन्स रंगत असतानाच 12 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. करणने वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकत अगदी दणक्यात बिग बॉस ओटीटीच्या मंचावर एन्ट्री घेतली.
यानंतर बिग बॉस ओटीटीचा पहिला स्पर्धक व अभिनेता राकेश बापट याची धमाकेदार एन्ट्री झाली. जब से तेरे नैना या गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स करत त्याने माहौल तयार केला. बिग बॉसच्या घरात यायला सुरूवातीला घाबरलो होतो, हे राकेशने मान्य केले. पण म्हणून त्याचा कॉन्फिडन्स कमी नव्हता.
बिग बॉस ओटीटीच्या घरात जाणारा दुसरा स्पर्धक होता अभिनेता झीशान खान. कुमकुम भाग्य फेम झीशानची एनर्जी पाहून करण जोहरही क्षणभर हैराण झाला. बाथ्रोबमध्ये झीशानची एन्ट्री झाली.
पंजाबी गायक मिलिंद गाबा हा बिग बॉस ओटटीच्या घरात एन्ट्री घेणारा तिसरा स्पर्धक ठरला. मी माझ्या आईमुळे शोमध्ये आलोय. कारण माझी आई या शोची खूप मोठी चाहती आहे, असे त्याने सांगितले.
‘डान्स दीवाने’ या रिअॅलिटी शोमुळे लोकप्रिय झालेला सुप्रसिद्ध कोरिओग्राफर निशांत भट्ट हा बिग बॉसच्या घरात जाणारा चौथ्या स्पर्धक बनला. झलक दिखला जा हा शो आणि ऐ दिल है मुश्किल या सिनेमात निशांतने करणसोबत काम केले आहे.
ये दिल आशिकाना फेम अभिनेता करण नाथ हा बिग बॉस ओटीटीच्या घरात जाणारा पाचवा स्पर्धक ठरला.
प्रतीक सेहजपाल याने सहाव्या क्रमांकावर बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. घरात येताच त्याची झीशानसोबत जुंपली. पहिल्याच दिवशी प्रतीक व झीशान यांच्यातील ‘टशन’ चर्चेचा विषय ठरली. मी कर्मा आहे, गॉड आहे, असे दावे प्रतीक करू लागला.
सहा हँडसम हिरोनंतर बिग बॉसच्या घरात जाणारी ग्लॅमरस हिरोईन कोण असणार, याची उत्सुकता होतीच़ ती निघाली शमिता शेट्टी. शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने शोची सातवी स्पर्धक दमदार एन्ट्री घेतली. याआधीच बिग बॉसच्या एका सीझनमध्ये शमिता दिसली होती.
टीव्ही अभिनेत्री बोल्ड अॅण्ड ब्युटिफुल उर्फी जावेद 8 वी स्पर्धक बनून या शोमध्ये दाखल झाली.
सुपरस्टार सिंगर नेहा भसीन शोची 9 वी स्पर्धक बनून घरात दाखल झाली.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मूज जटाना ही शोची 10 वी स्पर्धक ठरली. मूज जटानाचे खरे नाव मुस्कान आहे.
भोजपुरीचा तडका लावायला आलेली भोजपुरी स्टार अक्षरा सिंह 11 वी स्पर्धक ठरली.
दिव्या अग्रवाल ही बिग बॉस ओटीटीची 12 वी स्पर्धक ठरली.
मलायकाच्या डान्सचा तडका
एका पाठोपाठ एक 6 पुरूष स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आणि यानंतर मंचावर आली ती मलायका अरोरा. परम सुंदरी या गाण्यावर तिच्या धमाकेदार अदांनी बिग बॉस ओटीटीच्या ग्रँड प्रीमिअरला ‘चार चांद’ लावले. यानंतर मेल कंटेस्टंट्सचा ‘मास्टर क्लास’ घेतानाही ती दिसली. सरतेशेवटी सहाही स्पर्धक सर्वगुणसंपन्न असल्याची पावतीही तिने दिली.
बिग बॉसह्णच्या ओटीटी व्हर्जनचे सूत्रसंचालन करण जोहर करणार आहे. नंतर टीव्हीवर ही जबाबदारी सलमान खान स्वीकारताना दिसेल.