बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान (Salman Khan) यंदा 'बिग बॉस ओटीटी'चा सीझनही (Bigg Boss OTT 2) होस्ट करत आहे. यामुळे त्याचं ओटीटी विश्वातही पदार्पण झालं आहे. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचं ग्रँड प्रिमिअर पार पडलं. सलमानने सर्व स्पर्धकांचा परिचय दिला. तर शोच्या पहिल्याच दिवशी एका स्पर्धकाच्या वर्तवणुकीवरुन बिग बॉसने त्याला थेट एलिमिनेटच केलं. घरात एंट्री घेतल्यानंतर काही तासांच्या आतच हे एलिमिनेशन झालं.
बिग बॉसचा पारा चढला
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पुनीत सुपरस्टार हा सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. तो आपल्या वर्तवणुकीमुळे बिग बॉसच्या निशाण्यावर आला होता. बिग बॉसच्या घरातील संपत्तीला ठेच पोहोचवण्याचं काम त्याने केलं.त्याने बाथरुमधील दोन फॅमिली पॅक टूथपेस्ट खराब केल्याच. पेस्ट काढून त्याने ती चेहऱ्यावर लावली. त्वचेसाठी तो रोज असं करत असल्याचा दावा त्याने केला.
पुनीत नेहमी म्हणत होता की बिग बॉसशी त्याला काही घेणंदेणं नाही तो शोला टीआरपी देत आहे. बिग बॉसने पुनीतला इशारा दिला आणि घरातील संपत्तीला नुकसान पोहोचवल्यामुळे त्याला फटकारलं. जर अशीच वर्तवणूक राहिली तर एलिमिनेट केलं जाईल अशी ताकीदही दिली. मात्र याचा पुनीतवर काहीच परिणाम झाला नाही. तो म्हणाला, 'तुम्हाला मला घरात ठेवायचं तर ठेवा नाही तर नका ठेवू. टीआरपी तुम्हाला मिळतीए मला नाही.'
यानंतर बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना एकत्र बोलावत पुनीत ला बाहेर काढण्यासाठी कोण कोण समर्थन देतंय असं विचारलं. यावर जास्त सदस्यांनी समर्थनार्थ मत दिलं. यामुळेच काही तासातच पुनीत सुपरस्टार घराबाहेर पडला.