गेल्या रविवारी ‘बिग बॉस ओटीटी’चा (Bigg Boss OTT) प्रीमिअर रंगला. करण जोहर (Karan johar) होस्ट म्हणून स्टेजवर आला आणि पाठोपाठ 13 स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. या 13 पैकी एका महिला स्पर्धकाची सध्या जोरदार चर्चा आहे. होय, ती म्हणजे शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty). खरं तर, शमिताला बिग बॉसच्या घरात पाहून चाहते जरा हैराण झालेत. कारणही तसंच होतं.
शमिताचा जीजू राज कुंद्रा जेलमध्ये आहे. बहिणीच्या चिंता वाढल्या आहेत. अशा अडचणीच्या काळात शमिता कुटुंबियांना एकटं सोडून बिग बॉसमध्ये आली हे पाहून अनेकांना धक्का बसला. पण शमिताने यामागचं कारणही सांगितलं. मात्र आता हे कारण काही अंशी खोटं असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.स्पॉटबॉयने सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, शमितानं शोमध्ये एन्ट्री करण्याबाबत खोटं सांगितलं.
‘काळ चांगला असो वा वाईट आपण श्वास घेणं सोडत नाही. मग आपण काम का सोडायचं? खरं सांगायचं तर बिग बॉसची ऑफर मला फार आधीच आली होती आणि मी ही ऑफर स्वीकारली होती. मग खूप काही घडले. (तिचा इशारा राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाकडे होता.) पण मी कमिटमेंट केली होती आणि एक बार जो कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनती..., असे शमिता म्हणाली होती. पण सूत्रांचे मानाल तर शमितानं जे काही सांगितलं ते सपशेल खोटं आहे. तिला अगदी शेवटच्या क्षणी बिग बॉसमध्ये सहभागी होण्याविषयी विचारणा झाली होती. विशेष म्हणजे, स्पर्धक म्हणून नव्हे तर केवळ गेस्ट म्हणून तिला केवळ चार दिवसांच्या सहभागासाठी विचारणा झाली होती. शोच्या आदल्या दिवशी तिला शोची ऑफर दिली गेली होती. आता यात किती तथ्य आहे, हे तर शमिताच चांगलं सांगू शकते. शमितानं ‘मोहब्बतें’ या ब्लॉकबस्टर सिनेमापासून करिअरची सुरूवात केली होती. यानंतर अन्य काही सिनेमात ती दिसली, पण तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. याआधी ‘बिग बॉस 3’मध्ये ती दिसली होती.