Bigg Boss 15 Winner : धमाकेदार ‘बिग बॉस 15’च्या ग्रँड फिनालेत 12 च्या ठोक्याला विजेत्याच्या नावाची घोषणा झाली आणि सेटवर एकच जल्लोष झाला. तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) या सीझनची विजेती ठरली. तर प्रतिक सहजपाल उपविजेता ठरला.
करण कुंद्रा, प्रतिक सहजपाल, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट या पाच फायनलिस्टमध्ये बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणाला निशांत भट्ट आणि शमिता शेट्टी हे दोघं बाद झालेत आणि प्रतिक सहजपाल, करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश असे टॉप 3 फिनाले रेसमध्ये उरलेत.
या तिघांमधून ‘बिग बॉस 15’चा विजेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना करण कुंद्राही बाद झाला आणि तेजस्वी व प्रतिक असे टॉप 2 स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत उरले. यापैकी कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सलमानने तेजस्वी प्रकाशच्या नावाची घोषणा केली. तेजस्वीला बिग बॉसची ट्रॉफी सोपवण्यात आली. ‘बिग बॉस 15’ची ट्रॉफी उंचावताना तेजस्वीच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता.‘बिग बॉस 15’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजस्वीने चाहत्यांचे मनापासून आभार मानलेत.
बिग बॉसच्या घरातील तेजस्वीचा प्रवास एकदम धमाकेदार ठरला. करण कुंद्रासोबतची तिची रोमॅन्टिक केमिस्ट्री चांगलीच गाजली. ‘बिग बॉस 15’च्या घरात तेजस्वी व करण कुंद्रा यांचा लव्ह केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती.
9 वर्षांचा मुलगा आणि 18 वर्षाच्या मुलीच्या लग्नावर आधारित टेलिव्हिजनची वादग्रस्त मालिका ‘पहरेदार पिया की’मध्ये दिसलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ‘खतरों के खिलाडी 10’या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. संस्कार, स्वरागिनी, पहरेदार पिया की, रिश्ता, कर्णसंगिनी अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली. टीव्हीवर कायम देसी अवतारात दिसलेली तेजस्वी ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 10’मध्येही तेजस्वीचा जलवा पाहायला मिळाला होता. रोहितची ती फेवरेट कंटेस्टंट बनली होती.
तेजस्वी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक बोल्ड व ग्लॅमरस फोटो तुम्हाला दिसतील. तेजस्वीच्या ‘पहरेदार पिया की’ हा शो चांगलाच वादात सापडला होता. या शोवर लोकांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यावर तो बंद करण्यात आला होता. तेजस्वी ही इंजिनिअर आहे. मुंबई युनिव्हर्सिटीतून तिने इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.