बिग बॉस-१६ मध्ये यंदा 'साऊथची सनी लिओनी' अशी ओळख असलेली अर्चना गौतम घरात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अर्चनाला या रियालिटी शोचं एन्टरटेन्मेंट क्वीनचाही टॅग देण्यात आला आहे. कारण पहिल्याच आठवड्यापासून अर्चनानं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. नुकतंच एका एपिसोडमध्ये अर्चनानं तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा खुलासा केला आणि जे ऐकून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
बिग बॉसच्या घरात वॉशरुमच्या परिसरात अर्चना गौतम ही स्पर्धक सौंदर्या शर्मासोबत गप्पा मारत होती. यातच अर्चनानं तिच्यासोबत घडलेली एक घटना सौंदर्याला सांगितली. काही गुंडांनी आपल्याला किडनॅप केलं होतं असं अर्चनानं सौंदर्याला सांगितलं. काही लोक माझ्या जवळ आले आणि आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचं सांगून मला घेऊन गेले होते. त्यांच्या पोशाखावरुन ते खरंच अधिकारी असल्याचं वाटलं आणि अर्चना त्यांच्यासोबत कारमध्ये बसून गेली. अर्चनानं सांगितली की त्या गुंडांनी नंतर तिच्याकडून १० लाख रुपयांची मागणी केली. तरीही ती किडनॅप झालीय याची कल्पना तिला नव्हती. अखेरीस २ लाख रुपये देण्यासाठी आपण तयार झाल्याचं अर्चनानं सांगितलं.
अर्चनानं सांगितलं की पुढे जाऊन एका ट्राफिक पोलीसानं त्यांची कार थांबवली आणि दंड आकारू लागले. जे लोक आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचं आपल्याला सांगत आहेत. तेच लोक आता ट्राफिक पोलिसांपासून स्वत:ची ओळख का लपवत आहेत? असा प्रश्न अर्चनाला पडला. त्याचवेळी संबंधित व्यक्ती हे सीबीआयचे अधिकारी नसल्याचं तिच्या लक्षात आलं आणि आपल्याला किडनॅप केलं जात असल्याची कुणकुण तिला लागली. तेव्हा अर्चनानं आरडाओरडा सुरू केला आणि तिथून पळ काढण्यात ती यशस्वी झाली. ही सर्व माहिती अर्चनानं 'बिग बॉस'च्या घरात दिली आहे.
अर्चनाला केली होती चाळीतील लोकांनी मदतअभिनेत्री अर्चनानं हेही सांगितलं की त्यावेळी कोणत्याही श्रीमंत व्यक्तीनं तिची मदत केली नाही. तर चाळीत आणि झोपडपट्टीत राहणारे लोकच तिच्या मदतीसाठी धावून आले होते. त्याचवेळी आपण राजकारणात येऊन गरीब मुलींची मदत करायची असं ठरवलं होतं, असंही अर्चनानं सांगितलं. अर्चनानं सांगितलेली कहाणी ऐकून सौंदर्यानं देखील तिचं कौतुक केलं.