Bigg Boss 16 Premiere : अखेर प्रतीक्षा संपलीये. ‘बिग बॉस 16’ला सुरूवात झालीये. गेल्या अनेक सीझनपासून सलमान खान हा शो होस्ट करतोय आणि यंदाचा सीझनही सलमान भाईच होस्ट करणार आहे. बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार याची उत्सुकता तुम्हाला असणारच. तर चला, पहिल्या स्पर्धकाची घोषणा झालीये.
सलमानच्या तुफानी एन्ट्रीने ‘बिग बॉस 16’ला ग्रँड प्रीमिअरला सुरूवात झाली. 9.30 च्या ठोक्याला भाईजान सलमान त्याच्या चिरपरिचित अंदाजात मंचावर आला. मग पहिल्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा झाली. निमरित कौर अहलूवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) असं या स्पर्धकाचं नाव आहे.
छोटी सरदारनी फेम निमरित कौर अहुवालिया ही बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. डेली सोपमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी निमरित बिग बॉसचा शो कसा गाजवणार, हे तर येणारा काळच सांगेल.
‘बिग बॉस’चं घर दरवेळी अनोख्या पद्धतीने, वेगवेगळ्या थीमनुसार सजवण्यात येतं. या सीझनची थीम सर्कस आहे. ‘बिग बॉस 16’चं घर सर्कस या थीमनुसार सजवण्यात आलं आहे. बिग बॉसच्या एन्ट्री गेटपासूनच सर्कसची थीम सुरू होते. वेलकम टू सर्कस असं बिग बॉसच्या एन्ट्री गेटवर लिहिलेलं आहे. यंदाच्या सीझनमध्ये एक नाही तर चार बेडरूम असणार आहेत. याला नावही देण्यात आलं आहे. फायर रूम, ब्लॅक अॅण्ड व्हाईट रूम, क्राईम रूम आणि विंटेज रूम. सगळ्यांची वेगवेगळी थीम आहे. राऊंड बेड, लक्झरी सुविधा, जकूजी कॅप्टन रूम सगळं कसं अलिशान आहे. या घराचा थाट पाहताना डोळे विस्फाटतील, इतकं सुंदर पद्धतीने घर सजवण्यात आलं आहे. सर्कस थीमचं सगळ्यांत मोठ्ठ हाईलाईट असेल तो म्हणजे मौत का कुआं. याठिकाणी स्पर्धक टास्क खेळतील. यावेळी डायनिंग प्रचंड अनोखा आहे. बीबी हाऊसमध्ये यावेळी अनेक नवे एलिमेंट्स सामील करण्यात आले आहेत. 98 कॅमेरे 24 तास स्पर्धकांवर नजर ठेवून असतील.