Join us

पहिल्याच दिवशी विकी जैनवर भडकले 'बिग बॉस', अंकिताचा चेहराच उतरला; नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 17:02 IST

घरात प्रवेश करताच विकी जैनच्या एका खेळीने बिग बॉसने त्याला चांगलंच सुनावलं आहे.

'बिग बॉस 17' चा ग्रँड प्रिमीयर काल पार पडला. १७ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला असून आता खरी मजा सुरु झाली आहे. या स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि पती विकी जैन (Vikas Jain) या जोडीने लक्ष वेधून घेतलंय. ही सेलिब्रिटी जोडी नक्की कशी खेळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. घरात प्रवेश करताच विकी जैनच्या एका खेळीने बिग बॉसने त्याला चांगलंच सुनावलं आहे. तर यामुळे अंकिता लोखंडे या प्रकारामुळे भडकल्याचं दिसतंय.

बिग बॉसच्या या पर्वात तीन भाग केले आहेत. दिल, दिमाग आणि दम अशा तीन भागांमध्ये स्पर्धक विभागले गेले आहेत. दिल म्हणजे क्रमांक एक, दिमाग क्रमांक दोन आणि दम क्रमांक तीन अशी विभागणी झाली आहे. यापैकी दिल या क्रमांक एकच्या खोलीत विकी आणि अंकिताने राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याशिवाय दिलमध्ये ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, मन्नारा चोप्रा आणि ईशा मालवीय हे देखील आहेत.

'बिग बॉस'च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये विकी जैन स्पर्धकांना भडकवताना दिसत आहेत. विकी काही स्पर्धकांना सांगत आहे की अजूनही वेळ गेलेली नाही निर्णय बदलता येईल. तुमच्याकडे फक्त दोन मिनिटांचा वेळ आहे. यानंतर बिग बॉस त्याला फैलावर घेतात. ते म्हणतात,'विकी भैय्या, जर डोकं चालवायची इतकीच हौस आहे तर तू का अंकिताच्या मागे नंबर एक मध्ये गेला.'

या सगळ्यानंतर विकी शॉक होतो आणि अंकिताचाही चेहरा उतरतो. ती भडकून तिथून निघून जाते. आता विकीचं हे डोकं त्याच्यावरच उलटं पडतं का हे पुढच्या एपिसोडमध्ये कळेल.

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडेटिव्ही कलाकार