Join us

बिग बॉस : स्वामी ओमची पुन्हा घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2016 1:57 PM

बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सीजनमधील स्वयंघोषित बाबा स्वामी ओम एकमेव असे स्पर्धक आहेत, जे सर्वाधिक वेळा बिग बॉसच्या घराबाहेर पडले ...

बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सीजनमधील स्वयंघोषित बाबा स्वामी ओम एकमेव असे स्पर्धक आहेत, जे सर्वाधिक वेळा बिग बॉसच्या घराबाहेर पडले अन् पुन्हा घरात अवतरले. यावेळेसदेखील रोहनने मारहाण केल्याचा आरोप करीत कानाची दुखापत झाल्याचा कांगावा करणाºया स्वामी ओमला काहीकाळ उपचारासाठी घराबाहेर ठेवल्यानंतर पुन्हा घरात पाठविण्यात आले आहे. घरात प्रवेश करताच त्यांनी घरातील सदस्यांशी जबरदस्त हुज्जत घातली आहे.  कॅप्टनशीप टास्कदरम्यान गौरव, रोहन आणि स्वामी ओममध्ये चांगलीच हातापाई झाल्याचे बघावयास मिळाले. यात रोहनने स्वामी ओमला जबरदस्त धक्का मारला होता. त्यानंतर स्वामी ओमने घरातील कॅमेºयासमोर येत बिग बॉसकडे मला एका कानाने ऐकू येत नसल्याची तक्रार केली होती. त्याचबरोबर शोल्डरलाही मार लागल्याचे म्हटले होते. बिग बॉसने स्वामी ओम आणि कॅप्टन मनवीरला कन्फेशन रूममध्ये बोलावून त्यांच्या कानाची तपासणी केली होती, }}}} परंतु त्यांना उपचाराची अधिक गरज असल्याने त्यांना घराबाहेर पडावे लागले. त्याबाबतच्या सूचना मनवीरला देण्यात आल्या होत्या. स्वामी ओम घराबाहेर पडल्याने घरातील काही सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र आता ते पुन्हा घरात परतल्यामुळे पुन्हा एकदा घरात अशांतता निर्माण झाली आहे. बिग बॉसच्या ‘न्यायनिवाळा’ या टास्कमध्ये ते पुन्हा एकदा घरातील इतर सदस्यांशी हुज्जत घालताना बघावयास मिळत आहेत. यावेळी त्यांचा सामना बानीशी झाला असून, या वादात मनू पंजाबी याने उडी घेतली आहे. त्यामुळे इंडियावाले विरुद्ध सेलिब्रेटी असा हा मुकाबला रंगणार आहे. जेव्हा रोहनने बाथरूममध्ये स्वत:ला कोंडून ठेवले होते, तेव्हा इंडियावाले विरुद्ध सेलिब्रेटी हा फरक प्रकर्षाने दिसत होता. यापूर्वीदेखील स्वामी ओमला दोनदा घराबाहेर काढण्यात आले होते. एकदा त्यांना सिक्रेट रूममध्ये ठेवले होते, तर दुसºयांदा न्यायालयीन प्रकरणामुळे त्यांना घराबाहेर पडावे लागले. आता तिसºयांदा ते घराबाहेर पडून पुन्हा घरात परतले आहेत. या तिन्ही वेळा स्वामी ओमची एक्झिट घरातील सदस्यांना सुखावणारी ठरली तर एंट्री तेवढीच दु:खद आणि धक्कादायक ठरली आहे.