Bigg Boss 16: ‘बिग बॉस’चा 16 वा सीझन वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. त्यातही ‘बिग बॉस’ रोज नवे ‘शॉक’ देत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये खुद्द ‘बिग बॉस’ खेळत आहेत, इथपर्यंत ठीक होतं. पण बिग बॉस स्वत: घरात अवतरतील, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. अजुनही तुमच्या लक्षात आलं नसेल तर हा ताजा प्रोमो तुम्ही पाहायलाच हवा. होय, यावेळी अनपेक्षित घडलं आणि बिग बॉसचा आवाज असलेले विजय विक्रम सिंह खुद्द घरात अवतरले. ‘बिग बॉस 16’ला विजय नॅरेट करत आहेत. अनेक प्रोमोमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता.
‘बिग बॉस 16’च्या आगामी एपिसोडमध्ये एक आगळावेगळा टास्क खेळला जाणार आहे. हा टास्क कोणता तर घरात येणाऱ्या पाहुण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा. अशात सुम्बुल तौकिर खानच्या वडिलांचं पत्र घेऊन एक पाहुणा ‘बिग बॉस’च्या घरात येतो. हा पाहुणा कोण तर खुद्द ‘बिग बॉस’चा आवाज असलेले विजय विक्रम सिंह. व्हाईट ओव्हर आर्टिस्ट विजय विक्रम सिंह गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉसला आवाज देत आहेत. ‘बिग बॉस’मध्ये ऐकू येणारा आवाज त्यांचा आहे. आत्तापर्यंत विजय विक्रम सिंह यांचा फक्त आवाज ऐकू यायचा. पण पहिल्यांदा ते ‘बिग बॉस’च्या घरात आले. त्यांना पाहून चाहतेही शॉक्ड झालेत.
कोण आहेत विजय विक्रम सिंह?विजय विक्रम सिंह हे प्रसिद्ध वॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. त्यांनी 2009 मध्ये वॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2010 मध्ये त्यांना बिग बॉसच्या निर्मात्यांकडून ई-मेल आला. ऑडिशनदरम्यान त्यांची निवड झाली. बिग बॉस या शोने त्यांना मोठी ओळख दिली. विजय यांनी आतापर्यंत जवळपास विजय विक्रम सिंह यांनी बिग बॉसच्या 14 सीझन्ससाठी काम केलंय. ते अभिनयक्षेत्रातही सक्रीय आहेत. फॅमिली मॅन 2, स्पेशल ओप्स 1.5- द हिंमत स्टोरी, 777 चार्ली यांसारख्या सीरिजमध्ये त्यांनी काम केलंय.
कोण आहे ‘बिग बॉस’चा रिअल व्हॉईस?बिग बॉसला आवाज देणारे फक्त विजय विक्रम एकटे नाहीत. बिग बॉसचे ओरिजिनल व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट अतुल कपूर आहेत. त्यांचासुद्धा आवाज खूप लोकप्रिय आहे. बिग बॉस चाहते है की.. हे वाक्य तुम्ही त्यांच्या आवाजात अनेकदा ऐकलं असेल. अतुल हे 2006 पासून बिग बॉसला आवाज देत आहेत. अनेक जाहिराती, सिनेमांनाही त्यांनी आवाज दिला आहे.