'बिग बॉस चाहते है' असं वाक्य ऐकू येताच बिग बॉसचं घर आठवतं. बिग बॉस (Bigg Boss) चा हा भारदस्त आवाज असणारे व्हॉइस आर्टिस्ट आहेत विजय विक्रम सिंह (Vijay Vikram Singh). नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत बिग बॉसचा भाग होण्यासंदर्भात बातचीत केली. त्यांच्या आयुष्यात एक अशी वेळ आली जेव्हा त्यांना दारुचं व्यसन लागलं होतं. हे व्यसन इतकं वाढलं की त्यांना जीवघेण्या आजाराला सामोरं जावं लागलं.
मिड डेला दिलेल्या मुलाखतीत विजय सिंह म्हणाले, 'मी काही मोटिव्हेशनल स्पीकर नाही त्यांना खूप ज्ञान असतं. मी अनुभवातून शिकतो आणि तेच इतरांना शिकवतो. मी आयुष्यात येणाऱ्या अपयशांना झेलू शकलो नाही. वयाच्या १९ व्या वर्षी मला दारु पिण्याचं व्यसन लागलं. त्यानंतर मी पुढचे 7 वर्ष डिप्रेशनमध्ये होतो. मी अक्षरश: मरायला टेकलो होतो. मला जीवघेणा आजार झाला होता.'
विजय स्वत:ला अपघाताने अभिनेता झाल्याचं समजतो. एमबीए केल्यानंतर त्याने साधा ९ ते ५ चा जॉब केला. तेही सरकारी नोकरी. वयाच्या ३२ व्या वर्षी त्याने करिअर बदलण्याचा निर्णय घेतला. व्हॉइस ओव्हर करायची त्यांची कायमच इच्छा होती. पण नंतर त्यांना फुल टाईम व्हॉइस ओव्हर करण्याचे ठरवले. 2009 पासून त्यांनी व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांचं काम बिग बॉस मेकर्सपर्यंत पोहोचलं. 2010 मध्ये त्यांना बिग बॉसची ऑफर आली. हा तोच सिझन होता ज्याचा सलमान खान पहिल्यांदाच भाग झाला होता.
विजय विक्रम केवळ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम न करता आता अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. मनोज वाजपेयी यांच्या 'द फॅमिली फॅन' या वेबसिरीजमध्ये काम केले आहे. शो मध्ये ते मनोज वाजपेयी यांच्या टीममध्ये असतात. ते म्हणतात, 'या शोने माझे डोळे उघडले. मनोज वाजपेयी यांना बघून कळले की अभिनयात बरंच काही शिकण्याची गरज आहे.'
विजय आता एकामागोमाग एक प्रोजेक्ट्स घेत आहे. यावर्षी त्यांचा एक सिनेमा आणि चार वेबसिरीज येणार आहेत. तसंच ते काजोलच्या डेब्यू सिरीज 'द गूड वाईफ' मध्येही दिसणार आहेत.