Join us

मृत्युला हुलकावणी देत तो झाला Bigg Boss चा आवाज; वयाच्या २६ वर्षी विजय सिंग यांनी सोडली होती जगण्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 1:29 PM

Vijay vikram singh: विजय आज एक सेलिब्रिटी लाईफ जगत असले तरीदेखील सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत येणारा शो म्हणजे बिग बॉस. आतापर्यंत या शोचे अनेक पर्व पार पाडले आहेत. मात्र, प्रत्येक पर्वात काही ना काही नवीन प्रेक्षकांना पाहायला मिळतं. त्यामुळे हा शो कायम चर्चेत असतो. यात खासकरुन बिग बॉसचा आवाज प्रेक्षकांना भावतो. 'बिग बॉस चाहते हैं कि...' असा दमदार आवाज आला की हा आवाज नेमका कोणाचा असेल असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.  परंतु, हा आवाज देणाऱ्या कलाकाराने खऱ्या आयुष्यात थेट मृत्युला हुलकावणी दिली आहे.

सलमानच्या (salman khan) या रिअॅलिटी शोमध्ये विजय विक्रम सिंग (vijay vikram singh) हे 'बिग बॉस'चा (Bigg boss) आवाज झाले आहेत. गेल्या १३ वर्षांपासून ते 'बिग बॉस'साठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज या शोची ओळख झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आवाजाची क्रेझ संपूर्ण देशभरात निर्माण होईल अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. विजय आज एक सेलिब्रिटी लाईफ जगत असले तरीदेखील सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे. अलिकडेच एका मुलाखतीत त्यांनी याविषयीचा खुलासा केला.

वयाच्या १९ व्या वर्षी गेले दारुच्या आहारी

विजय यांना लष्करात भरती व्हायचं होतं. त्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. वयाच्या १८ वर्षांपर्यंत त्यांनी आपल्या स्वप्नाचा पाठलाग केला. इतकंच नाही तर आर्मीसाठीची परिक्षाही दिली. मात्र, ते रिजेक्ट झाले. रिजेक्शनचं दु:ख पचवता न आल्यामुळे ते वयाच्या १९ व्या वर्षीच व्यसनांच्या आहारी गेले. त्यांना दारुचं व्यसन लागलं. याच काळात म्हणजे जवळपास ५ वर्षात त्यांनी ७ वेळा रिजेक्शनचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचं दारुचं व्यसनही प्रचंड वाढलं.  विशेष म्हणजे ते दारुच्या इतके आहारी गेले की वयाच्या २६ व्या वर्षीच त्यांचं यकृत (Liver) खराब झालं. त्याकाळात त्यांची जगण्याची शक्यता केवळ १० टक्के होती. 

दरम्यान, इतक्या कमी वयात आलेल्या या अनुभवामुळे त्यांनी चागलाच धडा घेतला आणि पुन्हा एकदा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहू लागले. विशेष म्हणजे नव्याने आयुष्य सुरु करणाऱ्या विजय यांनी सरकारी नोकरी मिळाली. नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

वेब सीरिजमध्ये केलंय काम

विजय यांनी फॅमिली मॅन, स्पेशल ऑप्स 1.5 आणि फर्जी सारख्या वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.

बिग बॉसची मिळाली ऑफर

अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत असतानाच विजय यांनी बिग बॉससाठी विचारणा करण्यात आली. त्यासाठी मी माझा आवाज रेकॉर्ड करुन मेकर्सला पाठवून दिला. त्यानंतर २ महिन्याने माझं ऑडिशन घेण्यात आलं. विशेष म्हणजे ऑडिशनच्या दुसऱ्याच दिवशी मला बिग बॉसचं काम मिळालं. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीसलमान खानटेलिव्हिजन