मेकओव्हरमुळे तिचं नशीब पालटलं, बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटला झटक्यात लागली सिनेमाची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 9:18 AM
मेकओव्हर केल्यानं कुणाचंही नशीब क्षणात पालटू शकतं हे झगमगत्या दुनियेत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.कारण मेकओव्हर केल्यानंतर लगेचच कामाचा ...
मेकओव्हर केल्यानं कुणाचंही नशीब क्षणात पालटू शकतं हे झगमगत्या दुनियेत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.कारण मेकओव्हर केल्यानंतर लगेचच कामाचा बडा प्रोजेक्ट हाती लागला तर सोने पे सुहागाच.हेच घडलं आहे 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोची स्पर्धक लोकेश कुमारी हिच्याबाबत. मेकओव्हरमुळे तिचे नशीबाचे दरवाजे उघडले आहेत असं म्हटल्यास असं वावगं ठरु नये.मेकओव्हरमुळे दक्षिणेतील बडा प्रोजेक्ट तिच्या हाती लागला आहे.तमिळ सिनेमाची ऑफर लोकेशला मिळाली आहे.मेकओव्हरसह तिने आपलं नावसुद्धा बदललं आहे.तिने आपलं नाव आता लोवी शरना असं करण्यात आलं आहे.याच नावाने आपली ओळख निर्माण व्हावी अशी तिची इच्छा आहे.मार्च महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असून ती कोणासोबत अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार त्या अभिनेत्याचे नाव अजून समोर आलेलं नाही.तारा प्रॉडक्शन अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे.लोवीने एका एजन्सीसह करार केला असून ती एजन्सी लोवीचे ब्रँडिंग करणार आहे.'बिग बॉस ११' मध्ये सामान्य जनतेतील प्रतिनिधी म्हणून ती सहभागी झाली होती.ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.ती नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या काही महिन्यांपासून लोकेश आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती.तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे.वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते.बिग बॉसमुळे लोकेश उर्फ लोवीला बरीच लोकप्रियता लाभली आहे.त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला.दिल्लीत राहणा-या लोकेशचा जन्म २४ मार्च १९९१ रोजी झाला आहे.तिला गायन,नृत्य आणि ट्रॅव्हलिंगची हौस आहे.अर्थशास्त्र या विषयात तिने मास्टर्सची डिग्री मिळवली आहे.