सबसे बडा कलाकार मधील बसंतीने घेतला ब्रेक !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2017 4:51 AM
'सबसे बडा कलाकार' हा शो फॉर्मेटसह छोट्या पडद्यावर फुट ऑन धमाल करण्याकरिता सज्ज आहे.अभिनेत्री रविना टंडन,बोमन इराणी आणि अर्शद ...
'सबसे बडा कलाकार' हा शो फॉर्मेटसह छोट्या पडद्यावर फुट ऑन धमाल करण्याकरिता सज्ज आहे.अभिनेत्री रविना टंडन,बोमन इराणी आणि अर्शद वारसी हे तिघे या शोला जज करणार आहेत. या शोमध्ये बालकलाकरांच्या ऑडीशन घेण्यात आले होते. त्यानुसार काही निवडक बालकलारांचा समावेश या शोमध्ये करण्यात आला.छोट्याशा प्रतिभाशाली मुलांनी आपल्या अदाकारीने बॉलिवूडच्या कलाकरांनाही थक्क केले आहे. या मुलांना देशभरातील हजारो मुलांमधून निवडण्यात आले आहे.ही मुले आपल्या अॅक्टमध्ये जीव ओततात. एक अशी उमेदवार आहे, चार वर्षांची आराध्या मेहता, जिने आपल्या बसंती अॅक्टने परीक्षकांचे मन जिंकले आहे. या चार वर्षांच्या मुलीकडून जवळपास दोन मिनीटांचा डायलॉग बोलताना पाहणे खूपच अनोखा अनुभव होता. सेटवर उपस्थित एक सूत्राने सांगितले की,बोमन इराणी या मुलीबाबत बरेच चिंतित होते.डायलॉग बोलण्याच्या दरम्यान एक असा क्षण होता, जेव्हा वाटले की तिला धाप लागत आहे.हे पाहून बोमन इराणी पाण्याची बाटली घेऊन तिच्याकडे पळाले,हेच कारण आहे की, या मुलांना उद्याचा 'सबसे बडा कलाकार' म्हटले जात आहे.आराध्याने पुढील क्षणालाच स्वत:ला सावरले आणि आपला पूर्ण डायलॉग बोलत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.'सबसे बडा कलाकार' हा नवा रिअॅलिटी शो 8 एप्रिलपासून सुरू होणार असून बच्चेकंपनीच्या कलाकारीने संपूर्ण हा शो रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करणार हे मात्र नक्की.