Join us

Bhau kadam : वडिलांचं अकाली निधन, राहती जागा सोडली, मग पानटपरी चालवली; सोपा नव्हता भाऊ कदमचा अभिनय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 9:37 AM

झगमगत्या कलाविश्वात वावरत असतांना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्याच्यातील साधेपणा जपला आहे.

उत्तम विनोदशैलीच्या जोरावर प्रेक्षकांचं अवितरपणे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे भाऊ कदम( bhau kadam). झगमगत्या कलाविश्वात वावरत असतांना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्याच्यातील साधेपणा जपला आहे. त्यामुळेच आज लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत भाऊ कदम यांचं नाव आवर्जुन घेतलं. कॉमेडीचं भन्नाट टायमिंग, अभिनय कौशल्य यामुळे भाऊ कदम रसिकांचा लाडके बनले आहेत. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे रसिकांना खळखळून हसवण्यास भाऊ भाग पाडतात. पण भाऊचा इथंपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. 

भाऊ कदम यांचे बालपण मुंबईतील वडाळा येथील बीपीटी क्वॉर्टर्समध्ये गेलं. त्यांचे शालेय शिक्षण देखील वडाळ्याच्याच ज्ञानेश्वर शाळेत झालं. वडिलांच्या अकाली निधन झाल्यानंतर भाऊंना वडाळ्यातील जागा सोडावी लागली. त्यानंतर ते कुटुंबियांसमवेत डोंबिवलीत राहायला गेले. घर खर्च चालवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला त्यांनी मतदार नावे नोंदणीच्या कामाला सुरुवात केली.

हेच काम करत असताना भावाच्यासोबत त्यांनी याच भागात पान टपरी सुरु केली. मतदानाची कामं, पान टपरी हा रहाटगाडा ओढत असतानाच त्यांनी त्यांच्यातील अभिनयाची आवडी जोपासली.  भाऊ त्या काळात नाटकांमध्ये काम करत होते.  भाऊ यांनी रंगभूमीवरून  अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.‘जाऊ तिथे खाऊ’ हे त्याचे नाटक त्या काळात चांगलेच गाजले होते. या नाटकामुळे भाऊंच्या करियरला एक दिशा मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

सुरुवातीला नाटकात काम करताना भाऊंना १०० रुपये मिळायचे. नंतर १५०, २५०, ३५०, ७५० एवढं मानधन मिळायला लागलं. त्यातून घर संसाराचा गाडा कसाबसा चालायचा. आज तेच भाऊ कदम  एका एपिसोडसाठी ऐंशी हजार रुपये घेतात, असे कळते.

आज भाऊ कदम स्टेजवर आलो की लोकांच्या टाळ्या आणि शिट्या पडतात. प्रेक्षकांकडून आज त्याला अपार प्रेम मिळतं. प्रत्येकाला आज भाऊ कदम आपला माणूस वाटतो. भाऊंनी नऊपेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि पाचशेहून अधिक नाटक प्रयोगांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :भाऊ कदमचला हवा येऊ द्या