Join us

Birthday Special : कधीकाळी कामासाठी दारोदार भटकला होता जेठालाल! आज एका एपिसोडचे घेतो दीड लाख!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 1:13 PM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी याचा आज (26 मे) वाढदिवस.

ठळक मुद्दे‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या एका एपिसोडसाठी दिलीपला आज दीड लाख रूपये मिळतात.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी याचा आज (26 मे) वाढदिवस. 26 मे 1968 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे त्याचा जन्म झाला. आजघडीला अनेक लोक दिलीप जोशीला जेठालाल याच नावाने ओळखतात. आज याच जेठालालबद्दल काही खास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अभिनयाच्या वेडापायी दिलीपने आपले शिक्षण अर्धवट सोडले होते. दिलीपला आजही याचा पश्चाताप आहे. एका मुलाखतीत तो याबद्दल बोलला होता. मी थिएटरमध्ये काम करायचो. शिक्षणाऐवजी अभिनयाच्या वेडाने मला पछाडले होते. याचमुळे मी शिक्षण अर्धवट सोडले. पण आज मला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. मी शिक्षण पूर्ण केले असते तर, असे अनेकदा मला वाटते.

वयाच्या 12 व्या वर्षापासून दिलीपने थिएटरमध्ये अभिनयास सुरुवात केली. आपल्या पहिल्या नाटकात दिलीप पुतळ्याची भूमिका मिळाली होती. म्हणजे,  7-8 मिनिटे त्याला केवळ पुतळा बनून उभे राहायचे होते.

‘पंछी एक डाल के’ या मालिकेतून दिलीपला टीव्हीवर पहिला ब्रेक मिळाला. यानंतर तो ‘जरा हटके’ या शोमध्येही त्याची वर्णी लागली. पुढे हम आपके है कौन, फिर भी दिल है हिंदुस्तानी, खिलाडी 420, वन टू का फोर अशा  काही चित्रपटातही त्याने काम केले. पण एकवेळ अशी आली की, दिलीपला काम मिळेनासे झाले. होय, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो मिळण्यापूर्वीची ही गोष्ट.

एका मुलाखतीत दिलीपने सांगितले होते की, अभिनयाच्या क्षेत्रात कशाचीही शाश्वती नाही. एकदा तुम्ही हिट झाला तरच काम मिळते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो मिळण्यापूर्वी मी अन्य एका शोमध्ये काम करत होतो. पण हा शो बंद झाला. माझ्या हाती कुठले नाटकही नव्हते. दीड वर्ष माझ्या हाताला काम नव्हते. त्या काळात ही फिल्ड सोडून दुसरे काही करावे का, हा प्रश्न अनेकदा माझ्या मनात आला होता.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या एका एपिसोडसाठी दिलीपला आज दीड लाख रूपये मिळतात. तो महिन्यातून सुमारे 25 दिवस काम करतो. 2008 मध्ये दिलीपला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो मिळाला.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा