Join us

Birthday Special : ‘त्या’ एका घटनेने मोना सिंगला दिला प्रचंड मनस्ताप, डिप्रेशनमध्ये गेली होती अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 8:00 AM

म्हणायला ती मॉडेल. पण सन 2003मध्ये ‘जस्सी जैसा कोई नही’ या मालिकेत ती झळकली आणि एका रात्रीत स्टार झाली. ही टीव्ही अभिनेत्री दुसरी कुणी नाही तर तिचे नाव आहे, मोना सिंग.

ठळक मुद्देकरण ओबोरॉय आणि बॉलीवुड अभिनेता विद्युत जामवाल यांच्याबरोबर मोनाचे अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. पण मोनाने कायम या चर्चांवर मौन बाळगणे पसंत केले.

म्हणायला ती मॉडेल. पण सन 2003मध्ये ‘जस्सी जैसा कोई नही’ या मालिकेत ती झळकली आणि एका रात्रीत स्टार झाली. ही टीव्ही अभिनेत्री दुसरी कुणी नाही तर तिचे नाव आहे, मोना सिंग.मोनाचा आज (8 ऑक्टोबर) वाढदिवस. 8 ऑक्टोबर 1981 रोजी पुण्यात जन्मलेल्या मोनाने अनेक रिअ‍ॅलिटी शो केलेत. अनेक मालिकाही केल्यात. पण ‘जस्सी जैसा कोई नही’ या मालिकेतील तिच्या सिंपल लूकवर प्रेक्षक असे काही फिदा झालेत की, मोना टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री बनली. तिची ही लोकप्रियता आजही कायम आहे. यानंतर थ्री इडियट्स, उटपटांग, झेड प्लस अशा काही चित्रपटांतही ती दिसली.

हीच मोना 2013 मध्ये डिप्रेशनची बळी ठरली होती. कारण होते   एक अश्लिल एमएसएस. होय, त्याचवेळी एक अश्लिल एमएमएस लीक झाला होता. या व्हिडिओत विवस्त्र अवस्थेतील महिला अभिनेत्री मोना सिंग असल्याचा दावा केला गेला होता.  काही क्षणांतच हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता.

अर्थात, मोना सिंगने या व्हिडिओला बनावट असल्याचा प्रतिदावा करत गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. मॉर्फिंगच्या माध्यमातून दुस-या कुणाच्या बॉडीवर माझा चेहरा लावून खळबळ माजवण्याचा आणि मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ती म्हणाली होती. या एमएमएस प्रकरणाने मोनाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. इतका की, ती काही काळ डिप्रेशनमध्ये गेली होती.

मोना अद्यापही अविवाहित आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून ती लग्न करणार अशी चर्चा आहे. तिचा तिचा परफेक्ट पार्टनर मिळाल्याचे मानले जात आहे.

याआधी करण ओबोरॉय आणि बॉलीवुड अभिनेता विद्युत जामवाल यांच्याबरोबर मोनाचे अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. पण मोनाने कायम या चर्चांवर मौन बाळगणे पसंत केले.  

टॅग्स :मोना सिंग