शाका लाका बूम बूम, कसौटी जिंदगी की, क्या होगा निम्मो का, संगम, देख इंडिया दे, लाफ्टर के पटाखे, कॉमेडी सर्कस, जरा नचके दिखा, दिल मिल गए, जोर का झटका, कॉमेडी का महा मुकाबला, नचलेवे विथ सरोज खान, सरस्वतीचंद्र, बेहद, बेपनाह अशा अनेक मालिका गाजवणारी आणि आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट हिचा आज (30 मे) वाढदिवस.
जेनिफर तिच्या अदाकारीइतकीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरचे तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांना अक्षरश: वेड लावतात.
वयाच्या १२ व्या वर्षी इंडस्ट्रीत पदार्पण केले. पण खरे तर तिला अभिनेत्री नाही तर एअर होस्टेस बनायचे होते.
आमिर खानच्या अकेले हम अकेले तुम या चित्रपटात ती झळकली. राजा की आएगी बारात, राजा को रानी से प्यार हो गया, कुछ ना कहो, लव किया और लग गई,फिर से या सिनेमांमध्येही काम केले.
बेहद या मालिकेत तिने साकारलेली मायाची भूमिका प्रचंड गाजली होती.
जेनिफरने करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले. पण 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. जेनिफर ही करणची दुसरी पत्नी होती. याआधी करणने अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केले होते. जेनिफरला घटस्फोट दिल्यानंतर करणने बिपाशा बासूसोबत लग्न केले. जेनिफर मात्र आजही सिंगल आहे.
जेनिफर ही तिच्या फिटनेससाठीही लोकप्रिय आहे. पण तिला जिमला जाणे अजिबात पसंत नाही. भाज्यांचा आणि फळांचा रस हा तिचा फिटनेस फंडा आहे.