Join us

"उर्फी जावेदचे व्हिडिओ पाहून माझा मुलगा म्हणाला...", पहिल्यांदाच बोलल्या चित्रा वाघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:15 IST

"९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालेल्या आईने व्हिडिओ पाठवले आणि...", उर्फी जावेद प्रकरणावर चित्रा वाघ यांचं भाष्य

भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या उर्फी जावेदचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आणि फॅशनवर आक्षेप घेतला होता. उर्फीने चित्रा वाघ यांना ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं होतं. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये ट्विटर वॉरही रंगलं होतं. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. या सगळ्या प्रकरणावर पहिल्यांदाच चित्रा वाघ यांनी भाष्य केलं आहे. 

चित्रा वाघ यांनी नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उर्फी जावेद प्रकरणावर भाष्य करत त्यांची बाजू मांडली.

पीडित चिमुकलीच्या आईने पाठवले होते उर्फी जावेदचे व्हिडिओ

"एक बाई मला सारखे मेसेज करत होती. मी त्यांना म्हटलं तु्मचं काय काम आहे ते मला मेसेज करा. पण, तिला माझ्याशी फोनवरच बोलायचं होतं. आणि मला खरंच वेळ नव्हता. एकदा रात्री २.३०-३ वाजताच्या सुमारास मी दौऱ्यावरुन आले आणि काहीतरी काम करत होते. त्या बाईचा मला फोन आला आणि मला म्हणाली चित्रा वाघ तुम्ही फक्त हाय प्रोफाईल केस बघणार आहात का? माझं डोकं सटकलं. मी तिला म्हणाले की मी तुम्हाला १०० वेळा सांगितलं तुमचा काय प्रश्न आहे तो मला मेसेज करा. पण, तुम्ही केला नाहीत. मग तिला फोन लावला. ती म्हणाली मी आता तुम्हाला व्हॉट्स अॅपवर काय पाठवलंय ते तुम्ही बघा. तिने क्लिप पाठवली होती. त्यामधे एक तरुणी अर्ध्या कपड्यांत रस्त्यावरुन चालली होती. आणि तिच्या मागे मुलं चेकाळून चालली होती. मला काही कळेना. तिने मला तिचे आणखी काही व्हिडिओ पाठवले". 

मुलाकडून कळलं उर्फी जावेद कोण

"तेवढ्यात माझा मुलगा आला आणि तो मला म्हणाला मम्मा तू हे काय बघतेय? खूप घाण बाई आहे ही...मी त्याला विचारलं की ही कोण आहे? तेव्हा तो म्हणाला की उर्फी जावेद नावाची ही मॉडेल आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्हिडिओ पाठवणाऱ्या बाईने मला फोन केला. तेव्हा तिने मला सांगितलं की चित्रा ताई तुमच्याकडून आम्हाला शासकीय मदत नकोय. आम्ही अतिशय चांगल्या कुटुंबातले लोक आहोत. माझ्या ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. आम्ही त्या ट्रॉमातून अजून बाहेर आलेलो नाही. आम्हाला तुमच्याकडून कसलीच मदत नकोय. पण, मला हे सांगायचं की हे तुम्ही थांबवा. उर्फीला सांभाळायला ४ बाऊन्सर आहेत. माझ्या मुलीचा काय दोष होता? हे भावना भडकवण्याचं काम सुरूये, तुम्ही याच्यावर काही बोलणार आहात की नाही? हा नंगानाच तुम्ही कधी थांबवणार? त्यानंतर मग मी उर्फी जावेदचा विषय हातात घेतला. तेव्हाही नेहमीप्रमाणे माझ्यावरच टीकेची झोड आली. काही महिल्याच म्हणाल्या की कोणी काय घालायचं याचा संविधानाने दाखला दिलाय", असंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :चित्रा वाघभाजपाउर्फी जावेद