Join us  

...म्हणून 'बिग बॉस' होस्ट करण्यासाठी दिला होकार; रितेश देशमुखने सांगून टाकलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 3:37 PM

रितेशने नुकत्याचं पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 'बिग बॉस'साठी का होकार दिला याबाबत भाष्य केलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस' मराठी (Bigg Boss Marathi 5)चा पाचव्या पर्वाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. नुकतेच 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी रितेशने या शोची ऑफर का स्वीकारली, याबद्दल सांगितले. 

रितेशने नुकत्याचं पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 'बिग बॉस'साठी का होकार दिला याबाबत भाष्य केलं आहे. तो म्हणाला, 'या शोला होकार देण्याचं कारण म्हणजे या शोचा फॅन असलेल्या व्यक्तीला जर यात सहभागी व्हायची संधी मिळाली तर यासाठी कोण नकार देणार? म्हणून मी होकार दिला.  'बिग बॉस' या रिऍलिटी शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणं ही खूप मोठी संधी आहे असं मला वाटतं'.

अभिनेता रितेश देशमुखला 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वात सूत्रसंचालन करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. २८ जुलैला या शोचा ग्रँड प्रीमियर होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी ५' मध्ये मानसी नाईक, अंकिता वालावलकर, संजू राठोड, प्रणव रावराणे हे कलाकार दिसण्याची दाट शक्यता आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखसेलिब्रिटीटेलिव्हिजनबिग बॉसबिग बॉस मराठी