झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shikvin Changala Dhada)ने अल्पावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत मास्तरीणबाई आणि अधिपती यांची केमिस्ट्री रसिकांना प्रचंड आवडली आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हिने या मालिकेत मास्तरीण बाई अक्षराची भूमिका साकारली आहे तर अभिनेता ऋषिकेश शेलार(Hrishikesh Shelar)ने अधिपतीची भूमिका बजावली आहे. या मालिकेतून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान, शिवानी रांगोळे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिला आलेल्या अनोख्या अनुभवाबद्दल तिने सांगितले आहे.
शिवानी रांगोळे हिने लिहिले की, कितीही वेळा प्रवास केला तरी मुळात मी नर्व्हस फ्लायर आहे! अशा वेळी एका परक्या देशात असताना जेव्हा आपल्याला 'मास्तरीणबाई ' म्हणून हाक मारून, आपली काळजी घेतली जाते तेव्हा खूप छान वाटतं! आपलं काम , जे आपण आयुष्यभरासाठी निवडलं आहे, त्यातून पैशा बरोबर आनंद आणि समाधान मिळणं हे खूप दुर्मिळ असतं. आणि ते आपल्या बाबतीत खरं आहे ह्याचा वारंवार आनंद होतो! सानिका आणि इंडिगोने माझा प्रवास सुखकर केला, यासाठी मी त्यांची आभारी आहे.
वर्कफ्रंटअभिनेत्री शिवानी रांगोळे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती 'बन मस्का', 'सांग तू आहेस ना', डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथाया मालिकांमध्ये झळकली आहे. सध्या ती 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत काम करते आहे.