Join us

आजी जोडू शकेल का समीर आणि मीराची दुरावलेली मनं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 7:38 AM

असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसंच काहीसं झी मराठी वरील 'तुझं माझं ब्रेकअप' ...

असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसंच काहीसं झी मराठी वरील 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेतील समीर आणि मीरा बाबतीतही झालेलं प्रेक्षकांनी पाहिलं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रेम आणि आनंदात पार पडतात पण त्याचा गोडवा ओसरला की मग सुरु होते संसाराची तारेवरची कसरत. लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढायला लागतात आणि भांडायलाही लागतात आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जातं की ते दोघे वेगळे होतात. वेगळे होऊनही दोघे मित्र म्हणून एकमेकांना भेटतात आणि बोलतात. पण समीरने मेनकासोबत साखरपुडा केला ही गोष्ट मीराला खूप खटकते. बळजबरीने मेनकाच्या हातात अंगठी घालायला लागल्यामुळे समीरच्या डोक्याची तार सटकलीये. त्यामुळे आता लग्नाचा एकही शब्द काढायचा नाही असं तो ठामपणे मेनका आणि आईला सांगतो तसेच लग्न तो म्हणेल तेव्हा होईल आणि लग्नाची घाई केल्यास शहर सोडून जाण्याची धमकी देखील तो या दोघीना देतो. तर दुसरीकडे समीर आणि मेनकाच्या साखरपुड्यामुळे दुखावलेली मीरा समीरशी सगळे संबंध तोडते. ती त्याच्याशी तुटक वागायला लागते. आजी मात्र समीहनचं नेमकं काय प्रकरण आहे हे शोधून काढण्याचा अतोनात प्रयत्न करते आहे आणि त्यासाठी अर्नाळकरला ती कामाला लावते. तसंच दुसरीकडे घरी मेनका आणि लतामध्ये गैरसमज निर्णाण करण्याचा प्रयत्न आजी सुरु करते.आता आजी त्या दोघांना परत एकत्र आणेल का यशस्वी होईल का? समीर आणि मीरा यांच्यातील अबोला दूर होईल का? हे आपल्याला लवकरच कळेल.