जेव्हा जेव्हा लोक 'रामायण' मालिकेतील सीतेची आठवण करतात तेव्हा त्यांच्या मनात दीपिकाची एक साधी शांत प्रतिमा तयार होते. पण खऱ्या आयुष्यात खूपच मॉडर्न आहे.वयाच्या १४ वर्षापासून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. लहानवयातच दीपिका जाहीरातींमध्ये झळकल्या होत्या. दीपिका यांच्या वडीलांना त्यांचे अभिनय क्षेत्रात काम करणे अजिबात पसंत नव्हते. पण दीपिकाच्या आईचा या कामासाठी पूर्ण सपोर्ट होता.
दीपिका यांना जेव्हा रामायणची ऑफर मिळाली तेव्हा त्या केवळ १६ वर्षाच्या होत्या.दीपिका चिखलियाने रामायणातील सीतेची भूमिका करण्याव्यतिरिक्त हिंदी चित्रपटांसोबतच कन्नड, बंगाली, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'भगवान दादा' (1986), 'रात के अंधेर में' (1987), 'खुदाई' (1994), 'सुन मेरी लैला' (1985), 'चीख' (1986), 'आशा ओ भालोबाशा' (बंगाली, 1989) आणि 'नांगल' (तमिल, 1992) अभिनेत्री म्हणून त्या झळकल्या. मात्र सिनेमांतून त्यांना हवे तसे यश मिळाले नाही.यामधले काही सिनेमे तर ब्री-गेड होते.
सीता या भूमिकेने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले होते, घराघरात देवीप्रमाणे त्यांची पूजा केली जायची. त्यांची लोकप्रियता इतकी होती की, खुद्द राजीव गांधीनी देखील दीपिका यांना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रण दिले होते. दीपिकाला सारेच सीता याच इमेजमध्ये बघू लागले. रामायणनंतर कितीही प्रयत्न केला तरी ही इमेज त्या ब्रेक करु शकल्या नाहीत. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुरानाच्या 'बाला' या चित्रपटातही झळकल्या होत्या. या चित्रपटात यामी गौतमच्या आईची भूमिका साकारली होती.