Join us

तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांच्याविरोधात केस दाखल, कधीही अटक होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 9:44 AM

सेटवर कलाकारांना अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळायची असा आरोप निर्माते असित मोदींवर करण्यात आलाय.

गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) मालिकेच्या पडद्यामागचा वाद चव्हाट्यावर आला आहे. मालिकेतील अनेक कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पैसे थकवणे, महिलांसोबत गैरवर्तवणुक यामुळे निर्माते असित मोदी (Asit Modi) अडतणीत आले आहेत. तर आता असित मोदींविरोधात पोलिसांनी केस रजिस्टर केली आहे. 

तारक मेहता मधील कलाकारांच्या आरोपांनंतर निर्माते असित मोदी यांच्याविरोधात पवई पोलिसांनी केस रजिस्टर केली आहे. यासोबतच ऑपरेशन हेड सोहेल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतिन बजाज यांच्याविरोधात देखील कारवाई करण्यात आली आहे. कलम 354 आणि 509 अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मुंबईतील फिल्मसिटीतच मालिकेचा सेट आहे. सेटवर कलाकारांना अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळायची असा आरोप निर्माते असित मोदींवर करण्यात आलाय. पवई पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

तारक मेहताची भऊमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी दोन वर्षांपूर्वीच मालिका सोडली. अनेक महिन्यांचे पैसे थकवल्याप्रकरणी त्यांनी असित मोदींविरोधात तक्रार केली होती. यानंतर अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने लैंगिक छळाचा आरोप केला. यामुळे एकच खळबळ उडाली होती. असित मोदी महिलांशी घाणेरड्या शब्दात बोलायचे, त्यांना रात्री अपरात्री हॉटेल रुमवर बोलवायचे असा आरोप जेनिफरने केला. याशिवाय 'बावरी' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरियाने असित मोदींविरोधात सेटवर वाईट वागणूक दिल्याचा आरोप केला. तसंच रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनेही असित मोदींवर आरोप केले आहेत. या सर्व तक्रारी पाहता असित मोदीं आणि टीमवर कधीही कारवाई होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारमुंबई पोलीस