Join us

'चाहुल' मालिकेतील भोसले परिवाराची जल्लोषात साजरी झाली होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2017 10:52 AM

आज आसंमतामध्ये रंग बरसेचा नाद घुमतोय... लहानथोर सारेच विविध रंगात रंगून गेलेत... छोट्या पडद्यावरचे कलाकारही आपला होळीची उत्साह लपवू ...

आज आसंमतामध्ये रंग बरसेचा नाद घुमतोय... लहानथोर सारेच विविध रंगात रंगून गेलेत... छोट्या पडद्यावरचे कलाकारही आपला होळीची उत्साह लपवू शकत नाहीत.  होळी  रे होळी म्हणत  हे छोट्या पडद्यावरचे कुटुंब रंगपंचमी साजरी करतायेत.ते कुटुंब  दुसरे तिसरे कोणीही नसून ते कुटुंब म्हणजे भोसले परिवार.वाड्यामध्ये नुकतीच आलेली शांभवी हे सगळे मिळून होलिकादहन आणि रंगपंचमी हा सण साजरा केला आहे. या होलिकादहनाच्या निमित्ताने वाड्यामधील वाईट गोष्टींचा नाश होईल ? शांभवी वाड्यामधील रहस्य जाणू शकेल ? निर्मलाच्या हेतुंचे दहन होईल? हे बघणे रंजक असणार आहे. या शुभ दिनाच्या दिवशी काही अघटीत तर होणार नाही ना ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतील.'चाहूल' मालिकेमध्ये भोसले कुटुंबांनी होळीची जय्यत तयारी केली आहे. वाड्याच्या बाहेर होळी सजवली असून घरच्या सगळ्यांनी तिची पूजां केली, आणि सर्जाने होळीला अग्नी दिला.पण याचवेळी शांभवीच्या पदराला आग लागली आता हे कस झाल? कोणी केल? निर्मालानेच तर नाही ना केल हे तुम्हाला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी सर्जा, शांभवी आणि भोसले परिवार रंग खेळत असताना निर्मलाला देखील तिची आणि सर्जाची रंगपंचमी आठवते.तिने आणि सर्जाने रंग पंचमी कशी खेळली होती, किती रंग उधळला होता हे सगळच निर्मलाला आठवत.भोसले वाड्यामध्ये सगळे रंगपंचमी खेळले आहेत. कुठेही पाण्याचा अपव्यय न करता फक्त विविध रंगांनी देखील रंग पंचमीचा आनंद तितकाच लुटता येतो हे नक्की असा,संदेश चाहूल मालिकेचे कलाकर देत आहेत. रंग पंचमीच्या दिवशी सर्जा आणि शांभवीला रंग खेळताना बघून निर्मलाला वाईट वाटत आणि खूप राग येतो.निर्मलाला हे सहन होत नाही आणि ती निर्णय घेते कि मी सर्जा आणि शांभवीला कधीच एकत्र येऊ देणार नाही.