Join us

टिव्हीवरील कलाकारांनी जगावल्या होळीच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 5:55 AM

टेलिव्हिजन सेलिब्रिटीजना त्यांच्या लहानपणीच्या होळीसंबंधित आठवणींबद्दल आणि त्यांच्या यावर्षीच्या योजनांबद्दल विचारले आणि कोणाचे आयुष्य ते उजळून टाकू इच्छितात याबद्दलदेखील ...

टेलिव्हिजन सेलिब्रिटीजना त्यांच्या लहानपणीच्या होळीसंबंधित आठवणींबद्दल आणि त्यांच्या यावर्षीच्या योजनांबद्दल विचारले आणि कोणाचे आयुष्य ते उजळून टाकू इच्छितात याबद्दलदेखील विचारले. जय भानुशाली, द व्हॉईस इंडिया किड्चा निवेदक -  ज्या मुलांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही त्या मुलांच्या आयुष्यात रंग भरायला मला नक्की आवडेल. मोठी स्वप्ने बघण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी काहीतरी करावे अशी माझी इच्छा आहे. मी स्वतःला सतत अजून चांगले काम करायचे प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतो ज्यामुळे मी त्यांना शिक्षण देऊ शकेन. मी शाळेत होतो, मला आठवतंय त्यावेळी होळीदरम्यान आम्ही बिल्डिंगमधील सर्व मुले एकत्र येऊन टीम करायचो. आम्ही एकमेकांवर रंग फेकण्यासाठी दोन टीम करायचो आणि एक रंगांचे युद्धच असायचे. आमच्या या खेळाबद्दल आमच्या पालकांना माहीत नव्हते, त्यामुळे आम्ही ते बाजूला असताना प्रत्येकवेळी युद्धबंदी असल्याचे घोषित करायचो. प्रियांशु जोरा, हाय फिवर....डान्स का नया तेवरचा निवेदक कोणाच्याही आयुष्यात नवीन रंग भरण्यापेक्षा आपल्या आयुष्यात असलेल्या रंगांची त्यांना ओळख करून द्यायची इच्छा आहे ज्यामुळे ते स्वतःचा कॅनव्हास स्वतः रंगवू शकतील. होळीची माझी लहानपणीची एकच आठवण आहे. माझ्या मूळगावी राजस्थानात आम्ही होळीच्या  वेळी अगदी डीजेचा सेट लावायचो आणि संपूर्ण कुटुंब वेड्यासारखे नाचायचे. माझा आवडता हलवा आणि पुरी भाजीदेखील यावेळी आम्ही द्यायचो. यावर्षी मी मुंबईतच आहे आणि माझ्या मित्रांबरोबर होळी साजरी करेन.हाफ मॅरेजमधील माया ऊर्फ विंध्या तिवारी - माझ्या अगदी जवळीची व्यक्ती आपल्या आयुष्याशी झगडत असून त्या व्यक्तीला ब्लड कॅन्सर झाला आहे. तिच्या आयुष्यात आणि असे दुःख असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात रंग भरण्याची इच्छा आहे. आपल्या मिळालेलं आयुष्य साजरं करणं आपण बऱ्याचदा विसरून जातो. या होळीला प्रेमाचा प्रसार करा! मी वाराणसीची असल्यामुळे होळीचा खूप आनंद घेतला आहे. मी नवीन कपडे घालून माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी संध्याकाळदरम्यान जायचे.भाभीजी घर पर है मधील अनिता भाभी ऊर्फ सौम्या टंडन: होळीची माझी आवडती आठवण म्हणजे आपण जे सध्या मोठ्या शहरांमध्ये बघतो ते नसून अगदी कमी रंगांची उधळण. मी अगदी लहान शहरातून आलेय. तिथे ‘टेसूच्या फुलां’सह होळी खेळायचे. या फुलांपासून अगदी परंपरागत रंग बनवले जायचे. आमच्या शहरात मी राहात होते तिथे याची खूप झाडे होती. रंग येण्यासाठी आणि खेळण्यासाटी ही फुले काढून आम्ही पाण्यात भिजवून ठेवत होतो. मुंबई आणि दिल्लीमध्ये न ऐकलेले असे वेगवेगळे पदार्थ माझी आई बनवायची. कांजी, हिरव्या चण्याची बर्फी आणि गुजिया असे पदार्थ ती बनवायची. सध्या, माझ्या त्वचेसाठी वाईट असल्यामुळे केमिकल वा अशा रंगांनी मला होळी खेळायला आवडत नाही. माझ्या लहानपणीच्या आठवणी खूपच छान होत्या. खरे तर यावर्षी मी काय करणार आहे हे अजूनही मला माहीत नाही. मला जर सुट्टी मिळाली तर मी माझी काही घरची कामे आटोपून घेईन.cnxoldfiles/strong>: यावर्षी माझ्या आयुष्यातील ध्येयावर लक्ष ठेवून माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचे मी ठरवले असून मी माझ्याच आयुष्यात रंग भरणार आहे. लहानपणी मी माझ्या भावंडांबरोबर होळी खेळायचो आणि खूप मजा करत होतो. माझ्या घरी कोणतेही निर्बंध नव्हते. यावर्षी मला सुट्टी मिळाली तर मी चांगल्या होळी पार्टीला जाईन.