Join us

दुसऱ्या लग्नासाठी स्वीकारला मुस्लीम धर्म अन्...; घटस्फोटानंतर टीव्ही अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 3:11 PM

फरहान मिर्जाशी लग्न करण्यासाठी चाहतने मुस्लीम धर्म स्वीकारला होता. पण, नवऱ्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत तिने २०१८ साली घटस्फोट घेतला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने मुस्लीम धर्म आणि हिंसाचाराबाबत अनेक खुलासे केले.

'बडे अच्छे लगते है', 'कुबूल है' या मालिकांमुळे अभिनेत्री चाहत खन्ना प्रसिद्धीझोतात आली. अभिनयातील करिअरपेक्षा चाहत खन्ना तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत होती. पहिलं लग्न काही महिन्यांतच मोडल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा संसार थाटला होता. पण, अभिनय क्षेत्रात नाव कमावलेली चाहत खन्ना प्रेमाच्या बाबतीत मात्र कमनशिबी ठरली. तिचं दुसरं लग्नही मोडलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चाहत खन्नाने याबाबत भाष्य केलं. 

चाहतने २० वर्षांची असताना भरत नरसिंघानीसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर 2013 साली तिने फरहान मिर्जासोबत दुसरं लग्न केलं. फरहान मिर्जाशी लग्न करण्यासाठी चाहतने मुस्लीम धर्म स्वीकारला होता. पण, नवऱ्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत तिने २०१८ साली घटस्फोट घेतला होता. 'झूम/टेली टॉक इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने मुस्लीम धर्म आणि हिंसाचाराबाबत अनेक खुलासे केले. 

चाहत म्हणाली, "मला मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा पश्चाताप नाही. कारण, मला त्या धर्माबद्दल अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मी धार्मिक नाही, पण अध्यात्मिक आहे. माझा सगळ्या धर्मांवर विश्वास आहे. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी मुस्लिम धर्माबद्दल जाणून घेतलं. मी ईसा मसीह बरोबरच कृष्णाची भक्त आहे. मला मुस्लीम धर्मावर विश्वास ठेवण्यास ४-५ वर्ष लागली. पण, अजूनही माझा त्यांच्या काही मूल्यांवर विश्वास आहे. सगळं काही चांगलं आहे. पण, आता मी पुन्हा सनातन धर्म स्वीकारला आहे. आणि त्यामुळे मला अनेक गोष्टींमागचं सत्य समजलं आहे". 

मुस्लीम धर्म स्वीकारल्यानंतर ब्रेन वॉश केलं होतं का? असा प्रश्न विचारल्यानंतर ती म्हणाली, "मला नक्की माहीत नाही. पण, असं असू शकतं. म्हणूनच मी म्हणते की मी पुन्हा माझ्या घरी आली यासाठी आभारी आहे. मला माझ्या देवदेवतांची पूजा न करण्यास सांगितलं गेलं होतं. जे चुकीचं होतं. पण, आता मला कळतंय की नेमकं काय बरोबर आणि काय चुकीचं?". 

टॅग्स :टिव्ही कलाकारमुस्लीमसेलिब्रिटी