Join us

श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर, तरीही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झाली सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 18:42 IST

श्रेया बुगडे सगळं काही विसरून ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजर झाली. अर्थात एका क्षणी तिच्या अश्रूंचा बांध फुटलाच...

ठळक मुद्देअलीकडे मदर्स डेच्या दिवशी श्रेयाने तिच्या आई व मावशींसोबतचा एक बालपणीचा फोटो शेअर केला होता.

स्वत:चं दु:ख विसरून प्रेक्षकांचे मनोरंजन कलाकार विरळाच. अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) अशीच एक कलाकार. महाराष्ट्राला खळखळून हसवणा-या या मराठमोळ्या कॉमेडी क्वीनवर नुकताच दु:खाचा डोंगर कोसळला. पण स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून ती प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली. ‘चला हवा येऊ द्या’च्या  (Chala Hava Yeu Dya) सेटवर सगळं काही विसरून हजर झाली. अर्थात एका क्षणी तिच्या अश्रूंचा बांध फुटलाच.सध्या जयपूरमध्ये ‘चला हवा येऊ द्या’चे शूटींग सुरू आहे. या कार्यक्रमात सुपरस्टार स्वप्निल जोशीचा एक खास भाग चर्चेत असतो.  या विशेष मुलाखतीत स्वप्निलने कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेसोबत गप्पा मारल्या. यावेळी स्वप्निल जोशीनेच श्रेया कुठल्या कठीण प्रसंगातून जातेय, याबद्दल सांगितले.

नुकतेच कोरोनामुळे श्रेयाच्या दोन लाडक्या मावशींचे निधन झाले. अगदी 24 तासांत दोन्ही मावशींनी जगाचा निरोप घेतला. स्वप्निलने श्रेयाला बोलतं केल्यावर ती यावर बोलली. ती म्हणाली, ‘ माझ्या या दोन्ही मावशींना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा आम्ही फक्त खबरदारी घेतली होती. पण दुसरी लाट आमच्या घरावर येऊन धडकली. या लाटेनं माझ्या दोन्ही मावशींना अवघ्या 24 तासांमध्ये आमच्यापासून हिरावून नेलं. मी त्या दोघींचीही  खूप लाडकी होते. त्या दोघीही अचानक सोडून जातील, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता, असे श्रेया म्हणाली आणि हे सांगताना तिला अश्रू अनावर झालेत.

श्रेयाचे पाणावलेले डोळे पाहून सगळेच हळहळले. पण सोबत, खासगी आयुष्यातील दु:ख विसरून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालेल्या श्रेयाचे सगळ्यांनी कौतुकही केले. अलीकडे मदर्स डेच्या दिवशी श्रेयाने तिच्या आई व मावशींसोबतचा एक बालपणीचा फोटो शेअर केला होता.  

टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्या