झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये आपल्या विनोदी अंदाजाने धमाल उडवून देणारा विनोदवीर अंकुर वाढवे नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. २८ जूनला अंकुरचा विवाह पार पडला. त्याने यवतमाळमध्ये कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर आता विदर्भातील पुसद गावात स्वागत समारंभ पार पडला. आता त्याने सोशल मीडियावर त्याचे लग्न झाल्याचे जाहीर केले आहे.
अंकुर वाढवे याने त्याच्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करीत लिहिले की, जे सगळ्यांच होत तेच झालं माझं, विवाह संपन्न
अकुंर वाढवेचा जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला होता. साखरपुडा झाल्याचे त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सांगितले होते. त्यानंतर आता यवतमाळ येथे त्याचे लग्न पार पडल्याचे समोर आले आहे.
त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स व कन्हैया या नाटकात काम केले आहे.