Join us

"सगळ्यांचंच आभाळ थोडं थोडं उसवलेलं असतं", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:25 PM

अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike)ची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

आपल्या विनोदी शैलीने रसिकांच्या मनावर अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) अधिराज्य गाजवतो आहे. विनोदाचा बादशाह म्हणून त्याला ओळखले जाते. झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या शोमधून तो घराघरात पोहचला आहे. या शोमुळे त्याच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही खूप वाढ झाली आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून तो चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. या पोस्टमधून त्याने त्याच्या आयुष्यातील काही लोकांचे आभार मानले आहेत.

कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, आपल्या सगळ्यांचंच आभाळ थोडं थोडं उसवलेलं असतं नाही का कुठून कुठून ! कुठून तरी गळकं, कुठून कोलमडलेलं, अर्धवट वाचलेल्या पुस्तकाच्या एखाद्या पाना सारखं अलगद दुमडलेलं. ह्या आभाळाचं ओझं सांभाळणारे कितीतरी हात आपल्या सोबत असतात, आपण मात्र बऱ्याचदा ते आभाळ “आपल्याच करंगळीवर” पेललय ह्या भ्रमात जगत असतो. कधी कधी जीवनाच्या धुंदीत आभाळ ठेंगणं होत आणि त्याचा तोल सांभाळणारे सगळे हात दिसेनासे होतात.

त्याने पुढे म्हटले की, पण ते असतात, कायम तिथेच असतात. म्हणून तर आपलं आभाळ अजूनही तरंगतय नाहीतर त्याच आभाळाच्या ओझ्याखाली कधीच चिरडले गेलो असतो आपण . घे सावरुनि “आभाळ” माझे माझ्या मधले “बाळ” माझे. (सुकून). “सुनयना, विजू दादा, संदीप दादा आणि “अमोल पणशीकर” तुमच्या सारखी माणस आयुष्यात आहेत म्हणून ह्या आभाळाचं अस्तित्व आहे. Thanks giving ची post थोडी उशीरा करतोय . 

टॅग्स :कुशल बद्रिके