Join us

मी पुना येईन , मी पुना येईन...! कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 6:03 PM

Kushal Badrike Post : कुशल सोशल मीडियावरही तितकाच अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या त्याच्या एका भन्नाट पोस्टची चर्चा आहे.

चला हवा येऊ द्या’  (Chala Hawa Yeu Dya)  या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दु:ख विसरायला लावणारा  कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike ). त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात.  स्कीट सादर करताना स्टेजवरील त्याची एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग सगळंच भन्नाट. अगदी सोशल मीडियावरच्या त्याच्या पोस्टही भन्नाट. होय, कुशल सोशल मीडियावरही तितकाच अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या त्याच्या एका अशाच भन्नाट पोस्टची चर्चा आहे.

कुशलने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोपेक्षा या फोटोला कुशलनं दिलेलं कॅप्शन लक्षवेध आहे. ‘मी पुना येईन , मी पुना येईन , मी पुना येईन .येताना फूड मॉलला काहीतरी खाऊन येईन..,’असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. आता त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स पडल्या नसतील तर नवल. कुशलच्या या मजेशीर पोस्टवर चाहत्यांकडून देखील कमेंटचा वर्षाव होत आहे.जमतंय...,असं म्हणत एका चाहत्याने कुशलच्या या पोस्टला दाद दिली आहे. ‘ लय कॉमेडी हाय तुम्ही राव..’, अशा शब्दांत एकाने या पोस्टचं कौतुक केलं आहे.  

  झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ नावाच्या विनोदी कार्यक्रमामधून कुशल  प्रकाशझोतात आला.  त्यानंतर  ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात विविध भूमिका करत असताना त्यांच्या अनोख्या विनोद शैलीमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. कुशलने मालिकांसोबतच  रंपाट, बायोस्कोप, स्लॅम बुक, बकुळा नामदेव घोटाळे अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. कुशलला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं स्वत: जितकी मेहनत घेतली तितकीत त्याच्या आईनं आणि पत्नीनं घेतल्याचंही तो सांगतो. कुशलीची पत्नी कलाकर आहे. ती एक कथ्थक नृत्यांगना आहे. कुशल त्याच्या मुलांसोबत व पत्नीसोबतचे देखील काही भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. कुशल  लवकरच ‘जत्रा 2’ या चित्रपटात दिसणार आहे. 

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या