Join us

#MeToo या मोहिमेबद्दल हे आहे चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 12:28 PM

#MeToo या मोहिमेद्वारे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीतून या अभिनेत्रींना चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आता मीटू प्रकरणावर चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेने आपले मत नोंदवले आहे.

#MeToo या मोहिमेद्वारे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीतून या अभिनेत्रींना चांगलाच पाठिंबा मिळत आहे. मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने तुनश्री दत्ता-नाना पाटकेर, आलोकनाथ यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. सई ताम्हणकरने ट्विटरवर आलोकनाथ यांना उद्देशून लिहिले की, 'तुम्ही कधीच शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही. तुम्ही नरकात सडणार'. आलोकनाथ प्रकरणावर सईने प्रतिक्रिया दिल्यानंतर नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या वादावर ती काय बोलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सईने एका वर्तनापत्राच्या मुलाखतीत नाना-तनुश्री वादावर आपले मत नोंदवले होते. तिने सांगितले होते की, नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीने जे काही आरोप केले आहेत, ते ऐकून मला नक्कीच धक्का बसला आहे. तिच्या आरोपात तथ्य असल्यास नाना पाटेकर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मला नक्कीच वाटते. 

आता मीटू प्रकरणावर चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेने आपले मत नोंदवले आहे. श्रेयाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे की, मीटू या मोहिमेमुळे अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. यामुळे महिलांवर झालेले अत्याचार समोर यायला मदत होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. पण अत्याचार हे कवळ महिलांसोबत होतात असे नाही. अशाप्रकारच्या अत्याचारांना पुरुष देखील मोठ्या प्रमाणात बळी पडतात. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते, याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पुरुषांनी देखील आपल्यावर झालेल्या अन्यायाला या मोहिमेद्वारे वाचा फोडण्याची गरज आहे. ही मोहिम चांगली असली तरी या मोहिमेचा उद्देश बाजूला पडला असल्याचे जाणवत आहे. ही मोहिम कशासाठी आहे हेच कळत नाहीये. काही जण केवळ टिआरपीसाठी देखील याचा वापर करत असतील. त्यामुळे खरे कोण खोटे कोण याबाबत मी काहीही सांगू शकत नाही. पण केवळ लैंगिक अत्याचार हे चित्रपटसृष्टीत होतात असे नाही. अत्याचार सगळ्याच क्षेत्रात होतात. त्यामुळे या अत्याचारांना वाचा फोडणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :श्रेया बुगडेमीटू