कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली ७ वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हवा येऊ द्या च्या मंचावर आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली, अगदी बॉलीवूड मधले सुपरस्टार ‘आमिर, शाहरुख, सलमान’ ह्यांना देखील हा मंच आपलासा वाटला, आमिर खान यांनी तर भाऊ कदम सोबत मराठीत स्किट सुद्धा सादर केलं.
आता चला हवा येऊ द्या चा रंगमंच संगीतमय होणार आहे. ह्या आठवड्यात चला हवा येवू दया च्या मंचावर हजेरी लावली ती गायक कैलास खेर, सावनी रवींद्र, वैशाली माढे, यांनी या वेळेची थीम होती असे गायक ज्यांनी आपल्या प्रादेशिक सीमा ओलांडून राष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कमावलं, तसेच 'झी टीव्ही’ वर सध्या गाजत असलेल्या 'इंडियन प्रो म्युझिक लिग' चं. ‘कैलास खेर’ मंचावर येताच त्यांनी आपल्या पहाडी आवाजात मराठी मातीतलं 'जीवा शिवा ची बैल जोड' हे गाणं गायलं आणि उपस्थितांची मन जिंकून घेतली, एकंदरीतच ह्या कार्यक्रमात ह्या नामवंत गायकांचा प्रवास आपल्याला अनुभवता येणार आहे. इंडियन प्रो म्युझिक लिग' या कार्यक्रमातून मुंबई टीम चं प्रतिनिधित्व करणारे पुर्वा मंत्री, इरफान, रचित अगरवाल हे स्पर्धक गायक यांनी देखील ह्या मंचावर उपस्थिती लावली होती. याच 'इंडियन प्रो म्युझिक लिग' मुंबई टीम चे कर्णधार कैलाश खेर आहेत.