KBC 16 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. हा शो सुरू होताच घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण टीव्हीसमोर बसतात. आपल्यालाही या शोचा भाग बनण्याची किमान एक संधी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. या शोच्या माध्यमातून अनेक जण लखपती आणि कोट्यधीश झाले आहेत. यामधील काही जण यशस्वी होतात आणि एक कोटी रुपये (Kaun Banega Crorepati) जिंकतात. 'कौन बनेगा करोडपती 16' ला यंदाच्या पर्वाचा पहिला करोडपती मिळाला आहे.
'कौन बनेगा करोडपती 16' ला यंदाच्या पर्वाचा पहिला करोडपती हा जम्मू-काश्मीरचे रहिवासी चंद्र प्रकाश ठरला आहे. चंद्र प्रकाशचा वय फक्त २२ वर्ष आहे. चंद्र प्रकाशने सर्व प्रश्नाची उत्तरे देत 1 कोटी जिंकले. यानंतर त्याने थेट 7 कोटीच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. चंद्र प्रकाशला 7 कोटीच्या प्रश्नाचे उत्तर माहिती होते. पण, थोडी शंका असल्याने त्याने 7 कोटीच्या प्रश्नावर खेळ सोडला.
कोणता होता 1 कोटींचा प्रश्न ?
कोणत्या देशाचे सर्वात मोठे शहर हे त्याची राजधानी नसून एक बंदर आहे, ज्याच्या अरबी नावाचा अर्थ शांततेचे निवासस्थान असा आहे. त्यात A) सोमालिया, B) ओमान, C) टांझानिया, D) ब्रुनेई हे चार पर्याय देण्यात आले. खूप विचार करून चंदरने टांझानिया हे अचूक उत्तर दिले आणि तो या सीझनचा पहिला करोडपती ठरला.
कोणता होता 7 कोटींचा प्रश्न ?
यानंतर आमिताभ बच्चन यांनी चंदरला 7 कोटींचा प्रश्न विचारला. प्रश्न होता - 1587 मध्ये उत्तर अमेरिकेत इंग्रज आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेले पहिले नोंदणी केलेले अपत्य कोण होते? या प्रश्नावर चंदरला वर A) व्हर्जिनिया डेअर, B) व्हर्जिनिया हॉल, C) व्हर्जिनिया कॉफी, D) व्हर्जिनिया सिंक असे चार पर्याय देण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर चंद्रप्रकाशला माहीत होते, पण खात्री नव्हती. यामुळे त्याने एक कोटी रुपये जिंकल्यानंतर खेळणे सोडण्याचा निर्णय घेतला. अमिताभ बच्चन यांनी त्यांना उत्तर निवडण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी D हा पर्याय निवडला आणि ते योग्य उत्तर ठरले.