Join us

'चाशनी' मालिकेच्या यशासाठी चांदनी आणि रोशनीनं घेतलं रिद्धी सिद्धीचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 8:12 PM

छोट्या पडद्यावर चाशनी नामक नवीन मालिका दाखल झाली आहे.

स्टार प्लसवरील नवी मालिका 'चाशनी'मध्ये चांदनी आणि रोशनीची भूमिका साकारणाऱ्या अमनदीप सिद्धू आणि सृष्टी सिंह यांनी सिद्धिविनायक रिद्धी सिद्धी मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. आपल्या नवीन मसालेदार मालिका चाशनीसाठी रिद्धी-सिद्धी यांचे आशीर्वाद घेतले.

स्टार प्लसने भारतीय टेलिव्हिजनवर 'चाशनी' नावाची मालिका भेटली आणली आहे, जो यातील अनेक मसालेदार मनोरंजनांनी भरलेला आहे. ही मालिका चांदनी आणि रोशनी या दोन बहिणींच्या असामान्य आणि गुंतागुंतीच्या नात्यावर आधारित आहे, ज्या नंतर सासू आणि सून बनून एकमेकांसमोर येतात. 'चाशनी'मध्ये अमनदीप सिद्धू, सृष्टी सिंग आणि साई केतन राव यांच्या प्रमुख भूमिका असून या मालिकेची निर्मिती संदीप सिकंद यांच्या सोल प्रॉडक्शनने केली आहे. ही मालिका स्टार प्लसवर ९ मार्चपासून रात्री ११ वाजता प्रसारित होणार आहे.

मालिकेत अमनदीप सिद्धू चांदनीच्या भूमिकेत आहे, जी फायर फायटर आहे, तर रोशनी तिची लहान बहीण आहे. या मालिकेतील एका महत्त्वपूर्ण घटनेने या दोघींचे आयुष्य बदलते आणि त्यासोबतच त्यांच्या नात्यातील समीकरण देखील पूर्णत: बदलून जाते. छोटी बहीण रोशनी ही चांदनीची म्हणजेच मोठ्या बहिणीची सासू बनते आणि दोन सख्ख्या बहिणी एका अनोख्या नात्याने एकमेकांसमोर उभ्या राहतात. 

अमनदीप सिद्धूने आपल्या सिद्धिविनायक मंदिरातील अनुभवाविषयी सांगितले की, "माझ्या नव्या शोच्या निमित्ताने मला बाप्पाचे दर्शन घेण्याची आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली याचा मला आनंद वाटतो आहे. आमचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि त्यामुळे उत्सुकता आणि खूप दडपण देखील आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आम्ही खूप थकलो होतो पण सिद्धीविनायक मंदिरात प्रवेश करताच सर्व अस्वस्थता, थकवा नाहीसा झाला आणि मला खूप आश्वस्त आणि शांत वाटलं. आता मला बाप्पाचा आशीर्वाद मिळाला आहे, त्यामुळे मी चाशनीच्या प्रक्षेपणासाठी नव्या जोमाने सज्ज झाले आहे.