Join us

'चंद्र आहे साक्षीला' फेम नक्षत्रा मेढेकर करतेय या अभिनेत्याला डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:23 IST

Nakshatra Medhekar : नक्षत्रा मेढेकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. बऱ्याचदा कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या रिलेशनशीपबद्दल जाहीर करताना दिसतात. नुकताच नक्षत्रा मेढेकर (Nakshatra Medhekar) हिचा वाढदिवस पार पडला. वाढदिवसाचे औचित्य साधून अभिनेता अभिजित आमकर (Abhijit Amkar) याने नक्षत्राला हटके अंदाजात शुभेच्छा दिला. अभिजीतने Have my heart असे कॅप्शन दिल्याने त्यांच्यात मैत्री पलीकडचे नाते आहे असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या वरून हे दोघे प्रेमात आहेत असे बोलले जात आहे.

नक्षत्रा मेढेकर हिचे पूर्ण शिक्षण ठाण्यात झाले. कॉलेज मध्ये असतानाच नक्षत्राला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. ईटीव्ही मराठी वरील ‘माझिया माहेरा’ या मालिकेतून तिला पल्लवीची मध्यवर्ती भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या मालिकेतून तिने विकास पाटील सोबत स्क्रीन शेअर केली होती. लेक माझी लाडकी, सूर राहूदे, चंद्र आहे साक्षीला अशा मालिकांमधून नक्षत्राला महत्वपूर्ण भूमिका मिळत गेल्या. काही म्युझिक व्हिडीओमधून नक्षत्रा झळकली आहे.

नक्षत्रा अभिजित आमकरला डेट करत असल्याचे त्यांच्या या फोटोवरूनच अंदाज समजते. तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणींनी देखील या फोटोवरून त्यांच्यात प्रेम असल्याचा खुलासा केला आहे. 

अभिजित आमकर हा मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आहे. हृदयी वसंत फुलताना, टकाटक, एक सांगायचंय, तुझ्यावाचून करमेना अशा प्रोजेक्टमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भ्रम चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकला.